प्रेम यशस्वी झाले नाही म्हणून आत्महत्या करणे योग्य आहे का?

रसिका जाधव (सकाळ वृत्तसेवा - यिनबझ)
Tuesday, 18 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • प्रेमात समोरच्या व्यक्तीने धोका दिला किंवा प्रपोज केलावर ती व्यक्ती नाही बोली तर, मग मुलगा किंवा मुलगी आत्महत्या करतात हा त्यांचा चूकीचा निर्णय आहे.

मुंबई :- प्रेमात समोरच्या व्यक्तीने धोका दिला किंवा प्रपोज केलावर ती व्यक्ती नाही बोली तर, मग मुलगा किंवा मुलगी आत्महत्या करतात हा त्यांचा चूकीचा निर्णय आहे. तुम्ही आत्महत्या करण्यापूर्वी एकदा आई-वडीलांचा विचार करा ते एवढ लहानच मोठ करतात. तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी किती स्वप्न पाहिली असतील एवढेच नाही तर त्यांनी तुम्हाला खूप कष्ट करून मोठे केले असते. असे कोणतेही पाऊल उचलण्या अगोदर फक्त आई-वडीलांचा एकदा विचार करा. प्रेमात धोका मिळाला म्हणून आत्महत्या करणे योग्य आहे का? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

मुळीच नाही. जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते ती आपल्याला धोका देऊच शकत नाही. आणि अशा व्यक्तीमुळे आपण आपला जीव का म्हणून गमवायचा? ज्यावेळी समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नाही तेव्हाच ती आपल्याला धोका देते. पण तीच गोष्ट आपणही समजून घेणं गरजेचं आहे.

जग खूप मोठं आहे. या संपूर्ण जगातल्या एका व्यक्तीने जर आपल्याला धोका दिलाच तर आपल्याकडे वेगळे खूप मार्ग असतात. गरजेचं नाही की यावर आत्महत्या करणे हाच एक पर्याय आहे. आत्महत्या करून काही मुले आणि मुली स्वतःचा जीव तर गमावतातच पण त्यानंतर त्यांच्या घरच्यांचे होणारे हाल त्यांना सहन करावा लागणारा त्रास त्याच काय? आपण इतर कोणासाठी तरी जीव देतो आणि त्याचा त्रास आपल्या घरच्यांना भोगावा लागतो. त्यामुळे कोणतंही टोकाचे पाऊल उचलण्याआधी खूप वेळा विचार करा.

श्रद्धा ठोंबरे

मला हे आत्महत्या करणे चुकीचं वाटत. कारण आत्महत्या करणे चुकीचंच आहे. पण आपण दोन-चार वर्षे प्रेम झालेल्या व्यक्तीसाठी आपण का आत्महत्या कराची जे प्रेम करूच शकत नाही ते धोकाच देणार. पण मला कळत की, आपल्याला आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम कोणीच नाही करू शकत. जर आपण दोन-चार वर्षे प्रेम झालेल्या व्यक्तीसाठी आपण आत्महत्या करतो तर आपण पहिला आपल्या आई-वडिलांचा विचार करावा जेव्हा आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेले कष्ट आठवावे.

जर कोणी धोका दिलाच तर ते दुसऱ्याच्या आयुष्या बरोबर फक्त टाईमपास केला आणि आशे माणस आयुष्यात कधी पुढे जात नाही. जर प्रेमच करायचं आहे तर आई-वडील, बहीण-भाऊ ह्यांच्यावर प्रेम करा आयुष्यात जर तुम्हला काही कमी पडू देणार नाही जर काही गरज लागली तर हेच माणस मदतीला पुढे येणार आहेत.

महेश सोरटे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News