2024 च्या पॅरिस ऑलिंपिकचे शिवधनुष्य उचलणे अवघड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

टोकियो ऑलिंपिकबाबत अनिश्‍चितता असतानाच 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकचे संयोजक कोरोनामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्‍याचा विचार करीत आहेत.

पॅरीस : टोकियो ऑलिंपिकबाबत अनिश्‍चितता असतानाच 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकचे संयोजक कोरोनामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्‍याचा विचार करीत आहेत. कोरोना महामारीमुळे कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीत ऑलिंपिक संयोजनाचे शिवधनुष्य उचलणे अवघड असल्याची जाणीव त्यांना झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास आव्हान खूपच खडतर होईल, अशी कबुली दिली जात आहे.

ऑलिंपिकसाठी 6.8 अब्ज युरोचे अंदाजपत्रक आहे. त्यातील 3.8 अब्ज युरोचा खर्च पॅरिस प्रशासन करणार आहे. त्यातील 1.1 अब्ज युरोचे पुरस्कर्ते लाभतील, असा कयास होता. मात्र त्याबाबत आता शंका आहे. जलतरण तलावाचा खर्च आत्ताच 11 कोटी 30 लाख युरोवरून 17 कोटी 47 लाख युरोंवर गेला आहे. संयोजकांनी आत्तापासून खर्चकपात कशी करता येईल, याचा विचार सुरू केला आहे आणि ते कठोरपणे करावे लागेल, असेही काही जण खासगी मान्य करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News