आयसीसीला ट्‌वेंटी-20विश्वकरंडक स्पर्धेबाबत निर्णय घेणे अवघड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 July 2020

2021 तसेच 2023 या वर्षी दोन विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धा होत आहेत, त्यामुळेच आयसीसीला ऑस्ट्रेलियातील ट्‌वेंटी-20विश्वकरंडक स्पर्धेबाबत निर्णय घेणे अवघड झाले आहे.

मेलबर्न:  2021 तसेच 2023 या वर्षी दोन विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धा होत आहेत, त्यामुळेच आयसीसीला ऑस्ट्रेलियातील ट्‌वेंटी-20विश्वकरंडक स्पर्धेबाबत निर्णय घेणे अवघड झाले आहे. ही स्पर्धालांबवल्यास ती दोन वर्षे लांबणीवर टाकणे भाग पडेल आणि स्पर्धा घेतल्यासत्या वेळी कोणाला कोरोनाची बाधा झाल्यास भविष्यातील क्रिकेट अवघड होईल,याची धास्ती आयसीसीला वाटत आहे.भारतात 2021 मध्ये विश्वकरंडक ट्‌वेंटी- 20 क्रिकेट स्पर्धा आहे, तसेच 2023 मध्ये विश्वकरंडक एकदिवसीय स्पर्धा आहे. त्यामुळे 2020 ची स्पर्धा 2022 पर्यंत थेट लांबवणे भाग पडेल. भारतातील 2021 ची स्पर्धा 2022 पर्यंत लांबवण्याचा प्रस्ताव होता; पण भारतात सलग दोन वर्षे विश्वकरंडक स्पर्धा झाल्यास पुरस्कर्ते मिळवण्यात अडचणी येतील.

ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेंटी- 20 स्पर्धा काही महिने लांबवल्यास ती 2021 मध्ये होईल. त्यामुळे एका वर्षात दोन विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धाही घेणे योग्य नव्हे, असा विचार होत आहे.विश्वकरंडक ट्‌वेंटी- 20 स्पर्धा लांबवणे नव्हे, तर ती कधी घेणार, हा प्रश्न जास्त बिकट आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख असलेल्या एहसान मणी यांनीही विश्वकरंडक ट्‌वेंटी- 20 स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात घेणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News