फिटनेस सेंटरमध्ये शारीरिक अंतराचे नियम पाळणे कठीण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 June 2020

शरीरसौष्ठव संघटनेतील पदाधिकारी तसेच जिमचे मालक राजेश सावंत यांचे मत

मुंबई : महाराष्ट्रातील व्यायामशाळा एका आठवड्यात खुल्या करण्याच्या निर्णयाचे मुंबईत अपेक्षेनुसार स्वागत झाले; पण त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी एका वेळी व्यायाम करणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे खडतर आव्हान मुंबईतील व्यायामशाळांसमोर असेल.

मुंबई तसेच राज्यभरातील जिम तसेच व्यायामशाळा 13 मार्चपासून बंद आहेत. त्या आता जवळपास साडेतीन महिन्यांनी उघडणार आहेत. मुंबई तसेच परिसरात जवळपास दोन हजार जिम, फिटनेस सेंटर आणि व्यायामशाळा आहेत. त्या सुरू होणार आहेत, हे महत्त्वाचे आहे, असे राज्य शरीरसौष्ठव संघटनेतील पदाधिकारी तसेच स्वतः जिमचे मालक असलेल्या राजेश सावंत यांनी सांगितले. जिम तसेच साहित्याचे निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच सुरक्षित अंतराचे बंधन असल्याने काही प्रश्न नक्कीच येतील, असे त्यांनी सांगितले. अर्थात सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आमच्यासाठी मोलाची असतील, असे त्यांनी सांगितले.

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे यांनीही हेच मत व्यक्त केले. ते म्हणाले, आम्ही याचा यापूर्वीच विचार केला आहे. निर्जंतुकीकरण, बॅचमधील मर्यादित संख्या हे महत्त्वाचे उपाय असतील. मास्क परिधान करणे आवश्‍यक आहे. आमच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात व्यायाम करणाऱ्यांत सुरक्षित अंतर असते; पण अनेक ठिकाणी हे अंतर कमी असते. त्यांच्यासमोर हे आव्हान जास्त असेल. त्यांना संख्या मर्यादित करावी लागेल, असे यांनी सांगितले.

मास्कसह व्यायाम करणे अवघडच असेल. ऑक्‍सिजन घेऊन आपण कार्बन डायऑक्‍साईड सोडत असतो. व्यायाम करताना श्वास जोरात घेतला जातो. मास्क असल्यास यात अडथळा येऊ शकेल.
- राजेश सावंत

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News