यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ताजेपणा येतो...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 September 2019
 • त्यामुळेच जिम आणि मजबूत वर्कआऊट करत असाल तर दररोज फलाहार करायला हवा.

शरीर तंदुरुस्त असूनही बऱ्याच मुलांचा पाहिजे तेवढा प्रभाव पडत नाही. याचे कारण असते त्यांचा निस्तेज चेहरा आणि सुकलेली त्वचा. शरीराला ‘फ्रेश लुक’ची जोड असेल तर ते व्यक्तिमत्त्व ठळक लक्षात राहते. त्यामुळेच जिम आणि मजबूत वर्कआऊट करत असाल तर दररोज फलाहार करायला हवा. फळांमुळे तुमची त्वचा चकचकीत होतेच, शिवाय मनही ताजेतवाने राहते आणि दमसासही वाढतो.

याबाबत काही टिप्स -

 • सफरचंदामध्ये सर्वांत जास्त जीवनसत्त्वे असतात. यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व व पोटॅशिअम भरपूर असते. त्यामुळे दररोज जिमला जाताना एक सफरचंद खाल्ल्यास उत्तम.
 • वजन वाढवायचे असेल तर केळ्याइतका चांगला पर्याय दुसरा कोणताच नाही. केळ्यांमधून कार्बोहायड्रेड मिळतात. त्यामुळे स्नायू तयार करायचे असतील तर नित्यनेमाने केळी खावीत.
 • व्यायामामुळे शरीरात उष्णता वाढण्याची शक्‍यता असते. अशा वेळी संत्री, मोसंबी, द्राक्षे, कलिंगड अशा रसाळ फळांचा रस घ्यावा.
 •  जिमहून आल्यावर काही क्षण विश्रांती घेऊन फ्रूट ज्यूस, मिल्क शेक किंवा फ्रूट सॅलड घ्यावे. त्यानंतर नियमित जेवण घ्यावे.
 • जेवण करतानाही चिक्कू, पेरू, अननस, फणस यांतील एखादे फळ असल्यास उत्तम. जेवणानंतर पल्प खाणे कधीही उत्तम.
 • काही जण दिवसातून तीन वेळा जिम करतात. त्यांनी दुपारच्या वेळी जिम झाल्यावर फळे खावीत. त्यामुळे सर्व प्रकारची जीवनसत्त्वे शरीराला मिळतात.
 • व्यायाम करताना बऱ्याचदा रक्तवाहिन्यांवर ताण पडत असतो. अशा वेळी द्राक्षे उपयोगी ठरतात. द्राक्षांमुळे रक्तवाहिन्यांना संसर्ग होत नाही. 
 • पपई, आंबा, स्ट्रॉबेरी, जांभूळ, करंवदे, डाळिंब, चेरी या फळांचाही आहार घ्यावा.
 • आवळ्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. पचनक्रियेसाठी आवळा फायदेशीर असतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी आवळ्याचा ज्यूस घ्यावा. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोटही साफ राहते, ॲसिडिटी होत नाही आणि दृष्टीही सुधारते.
 • केवळ फळांमुळे शरीर तयार होत नाही. पण, ते तयार होण्यासाठी वेगवेगळ्या जीवनसत्त्वांची गरज असते. त्यामुळे व्यायामाला फळांची जोड हवीच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News