रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे झाले सोपे; हे घरगुती ड्रिंक वाढवणार इम्युनिटी पॉवर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020

सध्या पावसाळा सुरू झाला, वातावणात मोठा बदल झाला. त्यामुळे विविध व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढली आहे. व्हायरला पळवून लावण्यासाठी युनिटी सिस्टम मजबूत असणे गरजेचे आहे.

सध्या कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी फक्त एकच उपाय जनतेसमोर शिल्लक आहे. तो म्हणजे (इम्युनिटी सिस्टीम) रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जनता केमीकलयुक्त औषधांचा वापर करत आहे. त्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम जाणवायला सुरू झाली. घरगुती पदार्थांचा वापर करुन रोग प्रतीकारक शक्ती वाढवीता येते.

सध्या पावसाळा सुरू झाला, वातावणात मोठा बदल झाला. त्यामुळे विविध व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढली आहे. व्हायरला पळवून लावण्यासाठी युनिटी सिस्टम मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी घरामध्ये असलेल्या काही पदार्थांचा वापर करून इम्युनिटी सिस्टीम वाढविता येणे शक्य आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक इम्युनिती पावर ड्रिंक तयार करुन पिल्याने मोठा फायदा होणार आहे. त्यासाठी लागणारी प्रक्रिया आम्ही सांगणार आहोत. 

इम्युनिती पावर ड्रिंक

  • - एक ग्लास दूध 
  • - 25 ग्राम बदाम
  • - 25 ग्राम खारीख

कृती

सुरुवातीला बदाम आणि खारीक दुधात किंवा पाण्यात भिजवून ठेवा. पुर्ण भिजल्यानंतर मिक्सरमध्ये दोन्ही पदार्थ बारीक करा, त्यात दुध मिसळून पुन्हा एकत्र करुन घ्या. काही वेळानंतर हे मिश्रन एका ग्लासात काढा. झोपण्यापुर्वी दररोज इम्युनिती पावर ड्रिंक पिल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ड्रिंगचा वापर सकाळी नाश्ता करताना सुद्धा करु शकता. या ड्रिंकमुळे फक्त रोग प्रतिकारक शक्ती वाढत नाही तर व्यक्तीला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर विविध आजारापासून संरक्षण मिळते. या ड्रिंकमुळे मानवाची पचन क्षमता वाढते. आनंदी झोप लागते. आणि दिवसभर ताजतवाण जाणवत.
      

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News