...यामुळे कोरोना काळातही पाकिस्तान खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 June 2020
  • पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या डॉक्‍टरांचे मत

कराची: पाकिस्तान क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची पूर्वतयारी करीत आहे; पण त्याच वेळी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या डॉक्‍टरांनी महामारी सुरू असताना होणारा हा दौरा खूपच धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले; मात्र कोरोनातून बाहेर पडण्यासाठी हे आवश्‍यक असल्याचीही टिप्पणी केली.

कोरोना महामारी असताना खेळण्याचा अनुभव पाक संघाला नाही; पण हेच इंग्लंड संघाबाबतही आहे. महामारी असताना धोका असतोच; पण खेळ पाहून लोकांची करमणूक होते. त्यांच्यात उत्साह येतो, असे पाक मंडळाचे डॉक्‍टर सोहेल सलीम यांनी सांगितले. त्यांनी जर्मनी तसेच इंग्लंडमध्ये फुटबॉल लीग सुरू झाल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले.

पाकिस्तान संघात 29 खेळाडू असतील. हा संघ रविवारी इंग्लंडला रवाना होईल. त्यापूर्वी त्यांची दोनदा कोरोना चाचणी होणार आहे. इंग्लंडमध्ये संघ दाखल झाल्यावर पुन्हा चाचणी होणार आहे. त्यानंतरच जैवसुरक्षित वातावरणात संघाचा सराव होईल. दोन संघातील पहिल्या लढतीपूर्वीही चाचणी होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News