महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर सीसीटीव्हीबाबत अधिवेशनात लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे चर्चा करून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उपस्थित केला.

नवी मुंबई : महापालिकेच्या शाळेतील १४ मुलींचा संगणक प्रशिक्षकाकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचे पडसाद अर्थसंकल्पी अधिवेशनात उमटले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे चर्चा करून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उपस्थित केला.

 
पालिकेच्या शाळेत जाणाऱ्या मुलींसोबत झालेल्या या प्रकारामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. जर शाळेत मुली सुरक्षित नसतील, तर रेल्वेस्थानक, बसथांबे या ठिकाणी महिला कशा सुरक्षित राहतील, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला. त्यामुळे महिला व मुलींच्या संरक्षणासाठी सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणांसहीत शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. 

या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. महापालिका शाळांमध्ये तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच सीएसआर निधीतून उपलब्ध होणाऱ्या प्रशिक्षकांची पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतल्यानंतरच रुजू करण्याच्या स्पष्ट सूचना मिसाळ यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News