इरफान पठाणचा परदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याचा विचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020
  • आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू फ्रंचायझी आधारित एलपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत रस दाखविला आहे.

कोलंबो : आयपीएलमधून दुर्लक्ष केल्यानंतर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने परदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याचा विचार केला आहे. फक्त इरफानच नाही, तर अनेक परदेशी खेळाडूंनी लंका प्रीमियर लीगमध्ये (एलपीएल) खेळण्याचा विचार केला आहे. आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू फ्रंचायझी आधारित एलपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत रस दाखविला आहे.

याआधी इरफान पठाण गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. दरम्यान एलपीएल पुढील महिन्यात होणार आहे. या लीगमध्ये एकूण 23 सामने आहेत. या टी20 स्पर्धेत पाच संघ खेळतील. त्यांच्याकडे कोलंबो, कॅंडी, गले, दांबुला आणि जाफना हे संघ असणार आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने "डेली न्यूज'ला सांगितले की, "या लिगमध्ये परदेशी खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत. आता या क्रिकेटपटूंची निवड करणे संबंधित फ्रॅंचायझींवर अवलंबून आहे.' याव्यतिरिक्त पठाणने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद, रायझिंग पुणे, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स (पूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News