IPL: युवा खेळाडू शुभमन गिलच्या चमकदार कामगीरीमुळे KKR विजयी; कोण आहे गिल?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 27 September 2020

केकेआचा स्टार फलंदाज शुभमन गिलने 4 चौके आणि 2 छक्के लगावत 112.90 च्या स्ट्राइक रेटने 62 बॉलमध्ये नाबाद 70 रन काढले आणि इरोन मोर्ग यांच्यासोबत 90 रनांची भागीदारी केली. त्यामुळे SHR संघाला हारवण्यात KKR ला यश आले.

तरुण खेळाडू शुभमन गिल यांच्या धडाकेबाज कामगीरीमुळे कोलकत्ता नाईट रायडर्सने विजय मिळवला. कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (SHR) यांच्यात शनिवारी (ता. 26) रोमांचक सामना झाला. केकेआचा स्टार फलंदाज शुभमन गिलने 4 चौके आणि 2 छक्के लगावत 112.90 च्या स्ट्राइक रेटने 62 बॉलमध्ये नाबाद 70 रन काढले आणि इरोन मोर्ग यांच्यासोबत 90 रनांची भागीदारी केली. त्यामुळे SHR संघाला हारवण्यात KKR ला यश आले. आयपीएलमध्ये गिलचे हे पाचवे अर्धशकत आहे. दिलच्या शानदार कामगीरीमुळे मॅन ऑफ द मॅच देण्यात आला, तसेच विविध स्तरातून गिलचे स्वागत केले जात आहे.

केकेआर संघाचा मालक बॉलिवूडचा सुप्रसिद्ध कलाकार किंग खानने एक ट्विट करुन तरुण खेळाडूंना सुभेच्छा दिल्या. खाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, संघातील तरुण खेळाडूंनी चांगल्या प्रकारे प्रदर्शन केले. त्यामुळे संघाला विजय मिळाला. शुभमन गिल, नितिश राणा, शिवम मावी, आणि कमलेश नागरकोटी यांच्या नावाचा उल्लेख खेला. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांनी संघात आल्यामुळे स्वागत केले. संघातील जेष्ठ खेळाडूंनी तरुण खेळाडूंना योग्य मागदर्शन केल्यामुळे आभार मानले.

गिलच्या कामगिरीवर इंग्लड संघाचे माजी खेळाडू तथा कॉमेंट्री केविल पीटरसन यांनी एक ट्विट केले. 'शुभमन गिल हा खेळाडू केकेआरचा कप्तान हवा' असे ट्विट केले. या ट्विटला १३ हजार ६०० जणांनी लाईक केले तर १ हजार ३०० जणांनी रिट्विट केले.

कोण आहे गिल?

18 सप्टेंबर 1999 रोजी पंजाब राज्यातील फिरोपूर येथे जन्मलेला शुभमन गिल भारतीय संघाचा राईट हॉन्ड बॅट्समन आहे. 2018 साली भारतीय अंडर 19 मध्ये संघात खेळला. पृथ्वी शॉ यांच्या मार्गर्शनाखाली अंडर 19 कप जिंकला. त्यानंतर 2018 साली आयपीएलमध्ये केकेआयने 1 कोटी 8 लाख रुपये देऊन विकत घेतले, गेल्या वर्षी केलेल्या शानदार कामगीरीमुळे 'प्लेयर ऑफ द इयर' पुस्तकराने सन्मानित करण्यात आले. आयपीएलच्या 29 सामन्यांमध्ये 36 च्या सरासरी प्रमाणे 576 रन  बनवले आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News