कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा रद्द होणार आयपीएल २०२० ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा रद्द होणार आयपीएल २०२० ?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा रद्द होणार आयपीएल २०२० ?

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनवरती कोरोनाचं सावट पुन्हा एकदा दिसू लागलं आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी होऊ शकल्या नाहीत. तसेच यंदाचा आयपीएल सीजन सुध्दा भारतात होऊ शकला नाही. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन यंदाचा आयपीएल सीजन बीसीसीआयने युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. परंतु सीजन सुरू होणा-या आगोदर चेन्नई सुपर किंगच्या १२ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

युएईमध्ये आयपीएल होणार हे फायनल झाल्याने तेथील खेळाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. ठरलेल्या वेळेत तिथे संघ दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. त्यादरम्यान तिथं चेन्नई सुपर किंग्सचे 12 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. युएईमध्ये मध्ये आयोजित केलेलं आयपीएल सुध्दा रद्द करणार का ? असा प्रश्न चाहते विचारू लागले आहेत. या प्रकरणावरती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सुध्दा आपलं मौन सोडलं आहे. गांगुली असे म्हणाले की आयपीएल होणार की नाही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

चेन्नई सुपर किंग्सचे 12 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणाबाबत मी काहीच करू शकत नाही. आता आयोजित केलेलं आयपीएल होईल की नाही याबाबत मी काहीचं सांगू शकतं नाही असं सौरव गांगुली म्हणाले. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की आम्ही अशी अपेक्षा केली आहे की सर्व व्यवस्थित होईल. कारण आयपीएल अनेक दिवस चालणार आहे, त्यामुळे सगळ व्यवस्थित होईल अशी आशा आपण करू या.

मागच्या शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सचे 12 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याचबरोबर दुबईत सुध्दा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याव्यतिरिक्त सुरेश रैना कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेचा हवाला देत भारत परतला आहे. माझ्या कुटुंबाचा जीव मी धोक्यात घालू शकत नाही असं सुरेश रैनाने म्हटलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News