दररोज एवढी गुंतवणूक करून, १५ वर्षात तुमची मुलं होतील ३४ लाखांचे मालक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020
  • तुम्ही जर मोठ्या गुंतवणूकी बरोबर लहान-लहान गुंतवणूकीकडे तुम्ही जर लक्ष दिले तर भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
  • जर तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने शिस्तबद्ध पद्धतीने रोज केवळ १०० रुपयांची बचत केली, तर १५  वर्षात तुम्ही त्यांच्यासाठी ३४ लाखांचा फंड तयार करु शकता.

तुम्ही जर मोठ्या गुंतवणूकी बरोबर लहान-लहान गुंतवणूकीकडे तुम्ही जर लक्ष दिले तर भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने शिस्तबद्ध पद्धतीने रोज केवळ १०० रुपयांची बचत केली, तर १५  वर्षात तुम्ही त्यांच्यासाठी ३४ लाखांचा फंड तयार करु शकता. बचत जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढाच फायदा जास्त होईल. म्यूच्यूअल फंडच्या काही चांगल्या योजना तुमच्या फायद्याच्या ठरतील.

बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र जर सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळतो. असे अनेक इक्विटी म्युच्यूअल फंड आहेत, ज्यांनी लाँचनंतर गेल्या १५  ते २०  वर्षांत २०  टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. जर तुम्ही थोडी जोखीम उचल्याची तयारी दाखवत असला, तर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे. गुंतवणूक दीर्घकाळासाठी केल्यास बाजारातील जोखीम देखील कव्हर होऊ शकते.

असा बनेल ३४  लाखांचा फंड- तुम्हाला तुमच्या पाल्यांच्या नावाने रोज १०० रुपये अर्थात महिन्याला ३००० रुपये एसआयपीमध्ये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक १५  वर्षांसाठी करावी लागेल. जर यामध्ये तुम्हाला वार्षिक २० टक्के रिटर्न मिळाला तर १५  वर्षात तुमची गुंकवणूक वाढून ३४ लाख रुपये होईल. १५  वर्षात तुम्ही एकूण ५.४०  लाख रुपयांची गुंतवणूक कराल जे वाढून ३४  लाख रुपये होतील. म्हणजेच तुमची एकूण २८.६० लाख अधिकची कमाई होईल.

तज्ज्ञांच्या मते, म्युच्यूअल फंडमध्ये दर महिन्याला थोडी गुंतवणूक केल्याने चांगला रिटर्न मिळू शकेल. याचा सर्वात मोठा फायदा असा असतो की, तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लावले जातात. अर्थात वेगवेगळे स्टॉक्स, बाँड्समध्ये ही गुंतवणूक केली जाते. याचा फायदा असा होतो की, जरी एखाद्या कंपनीमध्ये लावलेले पैसे बुडाले तरी इतर गुंतवणुकीतून हे नुकसान कव्हर करता येते. चांगला रिटर्न देणारे काही म्युच्यूअल फंड- काही म्युच्यूअल फंडने गुंतवणूकदारांना १५ ते २० वर्षात २० टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. सुंदरम मिडकॅप फंडमध्ये २५.६४ टक्के, बिर्ला सन लाइफ इक्विटी फंडमध्ये १८.८० टक्के, DSP World Gold Fund 20%, Nippon India US Equity Opportunities Fund मध्ये जवळपास १७ टक्केचा रिटर्न मिळाला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News