1 लाख व्यवसायात गुंतवा; लाखो रुपये कमवा, जाणून घ्या उत्पनाचे 4 व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020

लाख रुपयापासून व्यवसायाला सुरुवात केल्यास लाखो रुपये कमावण्याची संधी काही व्यवसायांमध्ये उपलब्ध आहे. असे चार व्यवसाय आम्ही सांगणार आहोत

मुंबई : लॉकडाऊमुळे अनेक व्यवसाय बंद झाले,  देशावर आर्थिक मंदी आली, त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला. त्यामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र व्यवसाईकांनी हार न मानता पुन्हा एकदा व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी कंबर कसली. लाख रुपयापासून व्यवसायाला सुरुवात केल्यास लाखो रुपये कमावण्याची संधी काही व्यवसायांमध्ये उपलब्ध आहे. असे चार व्यवसाय आम्ही सांगणार आहोत ज्याची सुरुवात लाख रुपयापासून करता येते.

दुग्ध व्यवसाय 

सध्या पेट्रोलचा भाव दुधाला आला आहे. दूध जीवनावश्यक पदार्थ असल्यामुळे दैनंदिन जीवनात आवश्यकता भासते. दूध हा नेहमी नफा देणारा व्यवसाय आहे. त्याची सुरूवात लाखापासून करता येते. एका गायीचा दर तीस तर म्हशीचा पन्नास हजार आहे. त्यामुळे सुरुवातीला दोन म्हशी किंवा तीन गायी विकत घेऊन व्यवसायाला सुरुवात करता येते. दुध विक्रीतून जनतेची ओळख वाढते, तसेच डेयरीमध्ये विक्रीसाठी दुख टाकता येते. कमी पैशात चांगला व्यवसाय म्हणून सध्या दुधाकडे पाहिले जात आहे. 

फुलशेती

ज्या शेतकऱ्यांकडे अल्प प्रमाणात शेती आहे, अशा शेतकऱ्यांना फुलशेतीचा व्यवसाय फायदेशीर आहे. फुलशेतीची सुरुवात एक लाख भांडवलापासून सुरु करता येतो. शेतीमध्ये मोगरा, गुलाब, झेडू अशा प्रकारचे फुले लावून थेट बाजारामध्ये विक्री करता येते, फुलशेतीमधून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे सध्या परवडणारा व्यवसाय म्हणून फुलशेतीकडे पाहिले दात आहे. 

भाजीपाला

भाजीपाला अत्यावश्यक असल्यामुळे दैनंदीन लागणारी गरज आहे. सध्या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे भाजी विक्रीचा व्यवसाय चांगला नफा मळवून देऊ शकतो. ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी शेतीमध्ये भाजीपाला लागवड करून व्यवसायाला सुरुवात करू शकता, ज्यांना शेती नाही ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून भाजीपाला विकत घेऊन व्यवसाय करू शकतात. यात सध्या मोठी नफा मिळण्याची शक्यता आहे. 

पोटरी फॉर्म

सध्या पोल्ट्री फॉर्म हा मोठा व्यवसाय म्हणून उदयास आला. लाखापेक्षा थोडा खर्च अधिक पोल्ट्री फार्मला स्थापन करण्यासाठी येतो. मात्र सरकार त्यासाठी आर्थिक सहाय्य करायला तयार आहे. सरकार कडून अनुदान घेऊन पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू करता येतो. त्याचे दोन फायदे आहेत एक म्हणजे प्रत्यक्ष मास विकता येते आणि दुसरा कोमंडीपासून अंडे मिळतात त्याची विक्री करता येते. कमी भांडवलामध्ये हे चार व्यवसाय चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतात याचा विचार करावा तरुणांनी करावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News