InvdiavsSA - अखेर सामना भारताच्या पारड्यात...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 6 October 2019

विशाखापट्टणम - रोहित शर्मा, मयांक अगरवाल या फलंदाजांनी रचलेल्या पायावर रवींद्र जडेजा, आर. अश्विन या गोलंदाजांनी कळस चढवत, दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात 203 धावांनी धूळ चारली. आज, शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात जडेजाने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट् घेऊन, भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पण, आफ्रिकेच्या शेवटच्या दोन फलंदाजांनी चिवटपणा दाखवत भारतीय गोलंदाजांची दमछाक केली. त्यामुळे भारताचा विजय लांबला.

विशाखापट्टणम - रोहित शर्मा, मयांक अगरवाल या फलंदाजांनी रचलेल्या पायावर रवींद्र जडेजा, आर. अश्विन या गोलंदाजांनी कळस चढवत, दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात 203 धावांनी धूळ चारली. आज, शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात जडेजाने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट् घेऊन, भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पण, आफ्रिकेच्या शेवटच्या दोन फलंदाजांनी चिवटपणा दाखवत भारतीय गोलंदाजांची दमछाक केली. त्यामुळे भारताचा विजय लांबला.

विशाखापट्टणम : रोहित शर्मा, मयांक अगरवाल या फलंदाजांनी रचलेल्या पायावर रवींद्र जडेजा, आर. अश्विन या गोलंदाजांनी कळस चढवत, दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात 203 धावांनी धूळ चारली. आज, शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात जडेजाने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट् घेऊन, भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पण, आफ्रिकेच्या शेवटच्या दोन फलंदाजांनी चिवटपणा दाखवत भारतीय गोलंदाजांची दमछाक केली. त्यामुळे भारताचा विजय लांबला.

अनुभवी अश्विनची कामगिरी
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 502 या धावसंख्येवर डाव घोषित केला होता. मयांक अगरवालने 215 तर, रोहित शर्माने 176 धावा करत, भारताला सर्वोत्तम सरुवात करून दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 317 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. त्यानंतर, आफ्रिकेला पहिल्या डावात 431 धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आले होते. अनुभवी आर. अश्विनने सात विकेट् अफ्रिकेच्या बॅटिंग लाईनचे कंबरडे मोडले होते.

जडेजा, शमीनं जिंकलं
त्यानंतर भारताने दुसऱ्या डावातही चांगला खेळ केला. या डावातही 127 धावा करून रोहित शर्माने सामन्यात दुसरे शतक झळकावले होते. त्याला पुजाराने 81 धावा करून चांगली साथ दिली होती. भारताने 323 धावा करून, आफ्रिकेला 395 धावांचं लक्ष्य दिलं होतं. काल चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा, आफ्रिकेने एक बाद 11 अशी सावध सुरुवात केली होती. आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर मात्र, आफ्रिकेचे फलंदाज एका पाठोपाठ एक माघारी परतले.  एडन मार्करम, डीब्रुईन, डुप्लेसीस, डीकॉक यांपैकी एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाने सकाळच्या सत्रात आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर पाय रोवू दिला नाही. पण, केशव महाराज आणि डीएल पिडिट् यांनी नवव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करून भारताची डोकेदुखी वाढवली. पिडिट्ला बोल्ड करून, ही जोडी फोडली. अखेर मोहम्मद शमीने रबाडाला वृद्धीमान साहा करवी झेलबाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दृष्टीक्षेपात सामना
रोहित शर्मा-मयांक अगरवालची 317 धावांची विक्रमी सलामी
आफ्रिकेच्या केशव महाराजने पहिल्या डावात घेतले तीन बळी
आफ्रिकेच्या पहिल्या डावात एल्गरचे दमदार शतक; 287 चेंडूत 160 धावांची खेळी
मधल्या फळीत डिकॉकचे 111 धावांसह शतक
भारताच्या आर. अश्विनने घेतल्या सात विकेट्स
दुसऱ्या डावातही भारताची उत्तम फलंदाजी
रोहित शर्माने सामन्यात दुसरे शतक ठोकले
आर. अश्विनने 66 कसोटी सामन्यात घेतल्या 350 विकेट्स
रवींद्र जडेजाच्या 44 सामन्यात 200 विकेट्स
रवींद्र जडेजा ठरला वेगवान 200 विकेट्स घेणारा खेळाडू
कसोटीत 200 बळी घेणारा रवींद्र जडेजा दहावा भारतीय फलंदाज
आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाता मोहम्मद शमीने घेतले पाच बळी 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News