मुलाखत देणाऱ्या उमेदवारांना मिळणार दोन वेळचा प्रवास खर्च

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे देशाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक (रेल्वे, बस) बंद करण्यात आली. कन्टोमेंट झोन मध्ये प्रवेश निषेद करण्यात आला. अशा वेळी मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना आडचन निर्माण होऊ नये म्हणून विमान प्रवास खर्च आणि राहण्याची सोय आयोगाकडून करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे स्थगीत केलेल्या युपीएससी सीएसई परीक्षेच्या मुलाखती सुरु करण्याचा निर्णय युपीएसीने जाहीर केला. मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना दोन वेळचा प्रवास खर्च देण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना राहण्याची सोय नाही, अशा उमेदवारांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे मुलाखत देणाऱ्या उमेदवारांच्या प्रवासाची आणि राहण्याची चिंता मिटली आहे. 

कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकराने देशात लॉकडाऊन जाहीर केले. तेव्हा युनियन पब्लिक सर्विस कमिशनच्या २ हजार ३०४ सीएसई उमेदवारांच्या मुलाखतीची तयारी सुरु होती. २ हजार ३०४ पैकी १ हजार ८१ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र लॉकडाऊनमुळे मुलाखत प्रक्रीया स्थगीत करण्यात आली. उर्वरीत ६२३ उमेदवारांच्या मुलाखती प्रलंबित ठेवण्यात आल्या. प्रलंबीत मुलाखती २० जुलै ते ३० जुलै दरम्यान घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती युपीएससीने दिली.

देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे देशाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक (रेल्वे, बस) बंद करण्यात आली. कन्टोमेंट झोन मध्ये प्रवेश निषेद करण्यात आला. अशा वेळी मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना आडचन निर्माण होऊ नये म्हणून विमान प्रवास खर्च आणि राहण्याची सोय आयोगाकडून करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आयोगाने पाठवलेले मुलाखपत्र दाखवल्यानंतर कन्टोमेंट झोन मधून विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची परवानगी राज्याने द्यावी असे आवाहन आयोगाने केले. उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझर, ग्लोव्ह्ज असा एक संच आयोगाकडून दिला जाणार आहे. तो संच मुलखतीच्यावेळी वापरायचा आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुलाखतदारांनी योग्य खबरदारी घ्यायची आहे असे आयोगाद्वारे सांगण्यात आले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News