शरद पवारांची ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

या मुलाखतीत शरद पवारांनी चीनपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, अशा विविध विषयांवर आपली भूमिका मांडल्याचे संजय राऊत म्हणाले. 'सामना'त लवकरच या मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणार आहेत. तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवर ही मुलाखत प्रसारित होणार असल्याचे राऊत म्हणाले.

मुंबई (प्रतिनिधी):  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत देशात खळबळ माजवणार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव असतानाच, संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत अतिशय महत्त्वाची आहे. खुद्द संजय राऊत यांनी या मुलाखतीची माहिती ट्विटरद्वारे दिली. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतींनंतर, संजय राऊत यांनी सामना दैनिकासाठी पहिल्यांदाच अन्य राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची घेतलेली ही पहिलीच मुलाखत आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी चीनपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, अशा विविध विषयांवर आपली भूमिका मांडल्याचे संजय राऊत म्हणाले. 'सामना'त लवकरच या मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणार आहेत. तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवर ही मुलाखत प्रसारित होणार असल्याचे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाचे नेते शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होईल आणि वृत्त वाहिन्यांवर पाहता येईल. शरद पवार चीनपासून महाराष्ट्रातील घडामोडीपर्यंत जोरदार बोलले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News