SEBI मध्ये इंटर्नशीपची संधी; प्रति महिना ३५ हजार मानधन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

भांडवली बाजारावर नियंत्रन ठेवणारी सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) देशातील सर्वोंच्च संस्था आहे. संस्थेच्या आर्थिक आणि धोरण विश्लेषण विभागात एका वर्षासाठी इंटर्नशिप मिळणार आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन सुरु केले. लॉकडाऊन काळात सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ बंद करण्यात आले. तरी दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. महाविद्यालय, विद्यापीठ नक्की केव्हा सुरु होतील हे सांगने कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे सध्या भरपूर वेळ शिल्लक आहे. या वेळेत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी सेबीने उपलब्ध करुन दिली आहे. भांडवली बाजारावर नियंत्रन ठेवणारी सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) देशातील सर्वोंच्च संस्था आहे. संस्थेच्या आर्थिक आणि धोरण विश्लेषण विभागात एका वर्षासाठी इंटर्नशिप मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला ३५ हजार रुपये मानधन दिले जाईल. यशस्वी रित्या इंटर्नशिप करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  

काय आहे पात्रता

  • शासकीय मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्याचे शिक्षण. 
  • कमीत कमी दोन वर्ष पीएचडीचे पुर्व असावेत.  
  • प्रोजेक्टचा विषय वित्तीय अर्थशास्त्राशी संबंधीत असावा. अशाच विद्यार्थ्यांचा इंटर्नशिपसाठीअर्ज ग्राह्य धण्यात येईल. 
  • विद्यार्थ्यांना आकडेमोडीचे प्राथमिक ज्ञान असावे. तसेच आर/ पायथनचे प्रोग्रामिंग ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा

विद्यार्थी ज्या शिक्षण संस्थेमधून किंवा विद्यापीठातून पी. एचडी करत आहे. त्या विभाग प्रमुखामार्फत ऑफलाईन किवा ईमेलद्वारे अर्ज पाठवायचा आहे. अर्ज हा हार्ड कॉपीत असावा. इमेलद्वारे अर्ज पाठवायचा असेल तर हार्ड कॉपीची स्कॉनिंग करुन prabhakarrp@sebi.gov.in वर सेंड करावा. वैयक्तिक अर्ज सेबी स्विकारणार नाही आणि अर्धवेळ पी. एचडी करणारे विद्यार्थी अर्ज करु शकणार नाहीत. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

अधिक माहितीसाठी : www.sebi.gov.in 

सविस्तर जाहीरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News