ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेट, स्मार्टफोन उपलब्ध करुन देणार : कुलगुरु 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020

अनेक विद्यार्थ्यांकडे लॉपटॉप, संगणक, मोबाईल, इंटरनेट सेवा उपलब्ध  नसल्यामुळे ऑनलाईन वर्गाला विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाही. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन विद्यापीठाने मोबाईन आणि इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याची हमी दिली.

'कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल झाले. भविष्याची पावले ओळखून विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडे पुरेसे साहित्य नसल्यमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणपासून वंचित राहिले होतो, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन, इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्यण विद्यापीठाने घेतला' असे मत जादवपूर विद्यापीठाचे गुलगुरु चिंरजिव भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. 

कोलकत्ता येथील जादवपूर विद्यापीठाने सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रथम सत्राचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला. मात्र विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद लाभला होता. अनेक विद्यार्थ्यांकडे लॉपटॉप, संगणक, मोबाईल, इंटरनेट सेवा उपलब्ध  नसल्यामुळे ऑनलाईन वर्गाला विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाही. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन विद्यापीठाने मोबाईन आणि इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्याची हमी दिली. १० सप्टेंबरपासून आर्ट, सायन्स अभ्यासक्रमाची ऑनलाईन परीक्षा सुरु झाली, त्यामुळे विद्यापीठाने तात्काळ स्मार्टफोन विद्यार्थ्यांना दिले. 

'ज्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोनची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा फोन दिला जाणार आहे. फोन सोबत तीन महिन्याचा इंटरनेट डाटा दिला जाईल, प्रश्न पत्रिका, उत्तर पत्रिता अपलोड, डाऊनलोड करण्याची सोय मोबाईलमध्ये असेल, विद्यार्थी संघटनांनी जरगूंचे नाव विद्यापीठाला कळवायचे आहे त्यानंतर विद्यापीठ मोबाईल उपलब्ध करुन देणार आहे' अशी माहिती गुलगुरुंनी दिली.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News