International Yoga Day 2019 - 'ही' आहेत जगाने मान्यता दिलेली योगासने

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
 • पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी 2014-15 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर करावा, असा प्रस्ताव युनोमध्ये मांडला आणि संपूर्ण जगाने तो बहुमताने मंजूर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी 2014-15 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर करावा, असा प्रस्ताव युनोमध्ये मांडला आणि संपूर्ण जगाने तो बहुमताने मंजूर केला. योगशास्त्राला राजाश्रय मिळाला आणि पूर्वीपेक्षाही जास्त वेगाने योगप्रचार वाढू लागला. आत्मा आणि शरिर यांचा समन्वय साधायचा असेल तर योगा हा उत्तम मार्ग आहे. 21 जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असल्याने या दिवशी योग दिन साजरा केला जातो. 

योग साधनेचे अनेक उपयोग आहेत. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ लाभण्यासाठी ही योगासने केल्यास त्यांचा फायदा होतो. 

ताडासन 

लाभ 

 • शरीराची उंची वाढविण्यास मदत होते. 
 • एकाग्रता वाढते, शारीरिक आणि मानसिक तोल सांभाळण्याची सवय.

वृक्षासन 

लाभ 

 • शरीर संतुलित, सहनशील होण्यास मदत. 
 • स्नायूंची बळकटी आणि एकाग्रता वाढते. 

  पादहस्तासन 

  लाभ  

  • पायाच्या आणि पाठीच्या मणक्‍याची लवचिकता वाढते. 
  • पोटावर योग्य दाब येऊन पचनक्रिया सुधारते. 

  अर्धचक्रासन 

  लाभ 

  • कंबरेची आणि मणक्‍याची बळकटी वाढते. 
  • श्‍वसनक्षमता वाढण्यासह मानेचे, छातीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. 

  त्रिकोणासन 

  लाभ 

  • कंबरेचे, मानेचे, पाठीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. 
  • शरीराची रचना सुधारते आणि श्‍वसनाची कार्यक्षमता वाढते. 

  भद्रासन 

  लाभ 

  • गुडघे, मांडीचे आणि नितंबाचे स्नायू बळकट होता. 
  • गुडघ्यांचे दुखणे कमी होते. 

  वज्रासन 

  लाभ 

  • भद्रासनातील सर्व लाभ मिळतात, तसेच पचनक्रिया सुधारते. 
  • महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटातील तक्रारी असतात त्या कमी होतात. 

  अर्ध उष्ट्रासन 

  लाभ  

  • पाठदुखीपासून मुक्ती मिळते. 
  • डोके आणि हृदय यांतील रक्ताभिसरण सुधारते. 

  उष्ट्रासन 

  लाभ 

  • मणक्‍याची लवचिकता वाढते. 
  • डोके आणि हृदय यांतील रक्ताभिसरण सुधारते. 

  शशांकासन 

  लाभ 

  • तान, क्रोध कमी होण्यास मदत होते. 
  • पचनक्रिया सुधारते, पायांच्या तक्रारी बंद होतात. 

  उत्तान मण्डूकासन 

  लाभ 

  • पचनक्रिया सुधारते, पायांच्या तक्रारी बंद होतात. 
  • मांडीच्या आतील स्नायूंचे आरोग्य सुधारते. 

  वक्रासन 

  लाभ 

  • पाठीची लवचिकता वाढते. 
  • मधुमेहासाठी गुणकारी. 

  मकरासन 

  लाभ 

  • शरीराचा थकवा कमीत कमी वेळेत जाऊन शरीराला योग्य विश्रांती मिळते. 
  • तणाव आणि चिंता कमी होते. 

  भुजंगासन 

  लाभ 

  • पाठीची ताकद आणि लवचिकता वाढते. 
  • पोट, छाती यांची कार्यक्षमता वाढते. 

  शलभासन 

  लाभ

  • सायटिका आणि पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे कमी होते. 
  • स्थूलता कमी होते आणि पचनशक्ती वाढते. 

  सेतुबंधासन 

  लाभ 

  • मणक्‍याचे आजार कमी होतात. 
  • पायाची, पाठीची, खांद्याची बळकटी आणि फुफ्फुसे, हृदय सक्षम होण्यास मदत. 

  उत्तान पादासन 

  लाभ

  • पोटाची चरबी कमी होण्यास मदत. 
  • पचनशक्ती सुधारते. 

  अर्धहलासन 

  लाभ

  • पोटाची आणि पाठीची ताकद वाढविण्यास मदत. 
  • पचनशक्ती सुधारते. 

  पवनमुक्तासन 

  लाभ 

  • शरीराचा ताण कमी होतो. 
  • मन शांत राहते आणि शरीर सक्षम होते. 

  शवासन 

  लाभ 

  • शरीर आणि मनावरील तान कमी होण्यास मदत. 
  • प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढते. 

  कपालभाती 

  लाभ 

  • सर्दी, अस्थमा, कफ आणि मायग्रेन यांसाठी लाभदायक. 
  • शरीर आणि चेहरा तेजोमय बनतो. 

  अनलोम प्राणायम 

  लाभ 

  • शरीरातील ऊर्जेचे वहन करणे आणि शरीरशुद्धी करणे.
  • मन शांत, एकाग्र करणे. 

  शीतली प्राणायाम 

  लाभ 

  • उष्णता आणि पित्ताचा त्रास कमी होतो. 
  • झोप शांत लागते. 

  भ्रामरी प्राणायाम 

  लाभ

  • मानसिक ताण-तणाव कमी होतो. 
  • पंचेंद्रियांची क्षमता वाढते. 

  ध्यानमुद्रा 

  लाभ 

  • सकारात्मक भावना विकसित होते. 
  • मन एकाग्र होऊन मनोबल वाढते. 
  •  

  Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

  Download Samvad App playstore

  Related News