"शो मस्ट गो ऑन' असा निर्धार करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे इंग्लंडमध्ये पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • 2020 ते 2022 अशी तीन वर्षे ही सुपर लीग रंगणार आहे आणि हीच स्पर्धा 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेची पात्रता स्पर्धाही असणार आहे.

मुंबई/ दुबई:  "शो मस्ट गो ऑन' असा निर्धार करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे इंग्लंडमध्ये पुनरागमन झाले आहे. आता याच इंग्लंडमधून तीन दिवसानंतर आयसीसीच्या सुपर लीगचे रणशिंग फुंकले जाणार आहे. 2020 ते 2022 अशी तीन वर्षे ही सुपर लीग रंगणार आहे आणि हीच स्पर्धा 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेची पात्रता स्पर्धाही असणार आहे.

आयसीसीची ही नवी स्पर्धा असणार आहे. 2023 च्या स्पर्धेचे यजमान आणि सुपर लीगमधील सात अव्वल संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहे. इतरांचे स्थान मात्र या लीगमधून निश्‍चित होणार आहे. येत्या 30 तारखेला साऊदम्टनमध्ये गतविजेते इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात सलामीला सामना होईल आणि सुपर लीगचे बिगुल वाजेल.

50-50 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत पुढील तीन वर्षांत एक नवी स्पर्धा पाहायला मिळेल. त्याचबरोबर 2023 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रताही सिद्ध करता येईल. असे या सुपर लीगचे महत्त्व आहे, असे आयसीसीचे सरव्यवस्थापक ऑपरेशन जेफ आलड्रिच यांनी सांगितले.

अशी असणार स्पर्धा
- 13 संघ, 156 सामने
- 13 पैकी 12 आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व असलेले संघ, 13 वा संघ नेदरलॅंड
- कालावधी 2020 ते 2023
- 2023 विश्‍वकरंडक यजमान भारत आणि सात अव्वल संघ वर्ल्डकपसाठी पात्र
- उर्वरित पाच संघ आणि पाच सहयोगी संघामध्ये पात्रता स्पर्धा
- यातून दोन संघ 2023 वर्ल्डकपसाठी पात्र (एकूण संघ 10)
- सुपर लीगमध्ये एका विजयासाठी 10 गुण, टायसाठी 5 गुण
- सुपर लीगमध्ये प्रत्येक संघाला आठ मालिका खेळाव्या लागतील. तीन सामन्यांची एक मालिका असेल.

कशा होतील मालिका
जून महिन्यात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार होती. यातील पाचपैकी पहिले तीन सामने सुपर लीगच्या मालिकेत मोजले गेले असते. पुढील तीन वर्षांत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी दोन मालिका खेळणे अपेक्षित आहे. यातील एक मालिका सुपर लीगमध्ये गणली जाईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News