#internastional family day - एकत्रित नांदणारे गोकलाणी कुटुंब समाजासाठी ‘रोल मॉडेल’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 May 2019

अमळनेर - सोशल मीडियाच्या युगात विभक्‍त कुटुंब पद्धतीचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. छोटे कुटुंब, सुखी कुटुंब या उक्‍तीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र राहण्याची स्वार्थी वृत्तीही बळावली आहे. त्यामुळे आजी- आजोबा, काका- काकू, चुलत भावंडे असा गोतावळा एकत्र पाहायला मिळत नाही.

अमळनेर - सोशल मीडियाच्या युगात विभक्‍त कुटुंब पद्धतीचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. छोटे कुटुंब, सुखी कुटुंब या उक्‍तीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र राहण्याची स्वार्थी वृत्तीही बळावली आहे. त्यामुळे आजी- आजोबा, काका- काकू, चुलत भावंडे असा गोतावळा एकत्र पाहायला मिळत नाही. अशा परिस्थितीत येथील १९ सदस्यांचे गोकलाणी कुटुंब हे आदर्श ठरत असून, समाजासाठी रोल मॉडेल ठरत आहे.

मोठे कुटुंब ही सुखी राहू शकते, याचे जिवंत उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे. 
(कै.) गुरुजामल गोकलाणी यांना चार मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नी कलाबाई गोकलाणी यांच्यावर आली. पितृसत्ताक पद्धतीत या कुटुंबात सध्या मातृसत्ता पद्धत दिसून येत आहे. श्रीमती कलाबाई यांना चारही भावंडांची मदत होती. यात मोठे बंधू दिलीप गोकलाणी, धर्मेंद्र गोकलाणी, सरजूशेठ गोकलाणी, श्‍याम गोकलाणी यांचा समावेश आहे. सुरवातीला हॉटेल व्यवसायात असणारे हे कुटुंब एकत्रित राहिल्याने आर्थिकस्तर उंचावला. पर्यायाने सद्यःस्थितीत त्यांची लाखोची उलाढालही लक्षवेधी ठरत आहे.

दिलीप गोकलाणी व श्‍याम गोकलाणी हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचा व्यवसाय करत असून, धर्मेंद्र गोकलाणी हे मार्बल, ग्रेनाइट विक्रीचा व्यवसाय करतात. सरजूशेठ गोकलाणी हे नामवंत बिल्डर्स असून, शहरातील अनेक ठिकाणी त्यांनी गरिबांसाठी कमी दरात स्वप्नांचे घर उपलब्ध करून दिले आहे. शहराच्या बाहेर असलेली ड्रीम सिटीला अनेकांची पसंती मिळाली आहे. सद्यःस्थितीत तांबेपुरा भागात त्यांनी सुमारे अडीचशे घरांचे नियोजन सुरू आहे.

दिलीप गोकलाणी यांना पायल व कशीश या दोन मुली असून, त्या सध्या शिक्षण घेत आहेत. धर्मेंद्र गोकलाणी यांचा मुलगा पंकज हा वडिलांना मदत करत असून, सद्यस्थितीत तो कलागुरू मंगल कार्यालय व कलागुरू ज्वेलर्स हे चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. मुलगी पूजा हिचे लग्न झाले आहे. सरजूशेठ गोकलाणी यांना रितिका व गौरी या दोन मुली असून, आशिष हा मुलगा आहे. तिनीही शिक्षण घेतात. श्‍याम गोकलाणी यांना रिंकल व तरूण हे मुले असून, ते सुद्धा शिक्षण घेतात. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News