‘राझी’ चित्रपटाबद्दल आलियासोबतचा संवाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 December 2019

या चित्रपटात आलियाने साकारलेली सहमत या काश्‍मिरी मुलीची भूमिका फारच गाजली. आलियाबरोबरच अभिनेता विकी कौशल या चित्रपटात झळकला. आलिया-विकीचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट होता. विकीने या चित्रपटात एका पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका बजावली.

आजवर अभिनेत्री आलिया भट्टने अगदी कमी वयात आलियाने बरेच सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘राझी’. हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला.

आणि बॉक्‍स ऑफिसवरही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. या चित्रपटात आलियाने साकारलेली सहमत या काश्‍मिरी मुलीची भूमिका फारच गाजली. आलियाबरोबरच अभिनेता विकी कौशल या चित्रपटात झळकला. आलिया-विकीचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट होता. विकीने या चित्रपटात एका पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका बजावली. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सहमत पाकिस्तानी अधिकाऱ्याशी (विकी कौशल) लग्न करते.

पण पाकिस्तानात जाऊन गुप्तहेर करण्याचा आलियाचा मूळ उद्देश असतो. आणि ही संपूर्ण घटना दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी चित्रपटात अगदी उत्तमरित्या मांडली. या चित्रपटामधील जमेची बाजू ठरली ती चित्रपटाचे संवाद. आलियाचा या चित्रपटामधील संवाद तर प्रचंड गाजला. आणि तो संवाद म्हणजे ‘वतन के आगे कुछ भी नहीं, खुद भी नहीं’. हातात पिस्तूल धरत आलियाने म्हटलेला हा संवाद सुपरडुपर हिट ठरला. शिवाय या चित्रपटाने अनेक पुरस्कारही पटाकवले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News