नवी मुंबईत आंतरमहाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा - 2020 संपन्न

सकाळ (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी इतर उपक्रम सुद्धा राबविले जातात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी हा सामना आयोजित करण्यात आला होता. 

नवी मुंबई: राजीव गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, घणसोली तर्फे दरवर्षीप्रमाणे ११ आणि १२ जानेवारी रोजी महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. घणसोली येथील राजीव गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट नेहमीच कुठल्या ना कुठल्या उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवत असते. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी इतर उपक्रम सुद्धा राबविले जातात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी हा सामना आयोजित करण्यात आला होता. 

आर ए डी ए व्ही, मुलुंड या महाविद्यालयाच्या संघाने ह्या सामन्याचे विजेपदाचे शषक पटकावले आणि टिळक कॉलेज, वाशी या महाविद्यालयाच्या संघाने त्यांना बरोबरीची टक्कर दिली पण समोरच्या संघावर विजय प्राप्त करू शकले नाही. 

अंतिम सामना जिंकणाऱ्या गटाला स्मृतिचिन्ह आणि रोख ५१११ रुपये एवढे पारितोषिक दिले गेले आणि द्वितीय क्रमांक असलेल्या  संघाला उपविजेतेदाचे स्मृतिचिन्ह आणि रोख २१११ रुपये एवढे पारितोषिक देण्यात आले. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा सामना जिंकून आरजीसीएमएस च्या चषकावर आपले नाव प्रस्थापित केले. राजीव गांधी मनेजमेंट कॉलेज अँड स्टडीज चे डायरेक्टर डॉ. अनिल मटकर यांनी या सामन्यांचे उद्घाटन केले आणि विश्वस्त सुनील जाधव यांनी मैदानामध्ये येऊन स्वतः काही चेंडू खेळून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिल सोबत कॉलेजचे सर्व प्रोफेसर यांनी विद्यार्थ्यांसोबत एकजुटीने एकत्र येऊन या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

 अशा प्रकारच्या सामन्यांचे आयोजन होणे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणे हेसुद्धा शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत तेवढेच महत्त्वाचे आहे आहे असे मत कॉलेजचे प्रोफेसर डॉ. दिनेश गभने यांनी केले. या सामान्याला कॉलेज वयीन मुलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जवळपास चाळीस पेक्षा अधिक संघांनी या सामन्यांमध्ये आपला सहभाग नोंदवला. क्रिकेट सामन्यासोबत रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात एस आई ई एस कॉलेज, नेरूळ च्या संघाने बाजी मारली आणि विजेतेपद पटकावले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News