अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बुद्धविचार मार्गदर्शक - डॉ. साळुंखे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 2 March 2019

मुंबई : बुद्धविचार हाच अंधश्रद्धा निर्मूलनाचा सर्वोत्तम मार्ग असून आपल्याला खरोखरच अंधश्रद्धा निर्मूलन करायचे असेल तर गौतम बुद्धाची  बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वमूल्ये अंगीकारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्राच्यविद्यापंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. संदीप सारंग लिखित 'आपल्याला खरोखरच अंधश्रद्धा निर्मूलन करायचे आहे काय?' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. साळुंखे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. 

आज देशात आणि जगभर माणसामाणसात द्वेष पेरणाऱ्या सांप्रदायिक शक्ती फोफावलेल्या असताना बुद्धाचा सहिष्णुता, शांती आणि विवेकाचा संदेशच मानवी जीवन आश्वस्त करू शकेल असे विचार ख्यातनाम कवी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.

भारतीय समाजात चालत आलेला संघर्ष हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, बुद्धिप्रामाण्य विरुद्ध पारतंत्र्य, विषमता, वैर, अंधश्रद्धा या दोन विचारधारांमधला असून अंधश्रद्धांचे खऱ्या अर्थाने निर्मूलन करायचे असेल तर चिकित्सक विचारांचा पुरस्कार करणारा बुद्धविचार स्वीकारणे गरजेचे आहे, असे मत सुप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका डॉ. वंदना महाजन यांनी मांडले. पुस्तकाचे लेखक संदीप सारंग यांनी आपल्या मनोगतात समाजात वाढणाऱ्या अंधश्रद्धांबद्दल चिंता व्यक्त केली आणि असे का घडते आहे याच्या खोलात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचा जास्तीत जास्त खात्रीचा उपाय शोधून काढण्याचे आवाहन केले. धनंजय आदित्य यांनी सूत्र्संचालन केले. पुस्तकाचे प्रकाशक ऍड. विश्वास काश्यप यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News