झटपट शेंगदाण्याच्या कूटाची चिक्की

रसिका जाधव (सकाळ वृत्तसेवा - यिनबझ)
Monday, 2 March 2020
  • चक्की म्हटलं की, लोणवळ्याची चक्की आपल्या आठवते. 
  • क्रश (शेंगदाणा) चिक्की तर खूप आवडती असते. 

चक्की म्हटलं की, सगळ्याच आठवते ती, लोणावळ्यांची चक्की पण तशी चक्की आता तुम्ही तुमच्या घरी सुध्दा बनवू शकतात. 

साहित्य :-  

  •   १ वाटी दाणेकूट

  •   १ वाटी साखर

  •   २ चमचे तूप

  •   चिमुटभर मीठ

     

कृती :- 

मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घालून परतून घ्या आणि नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घ्या. पाणी घालू नका. साखर विरघळू लागली की, त्यावेळी एक चमचा तूप घाला आणि शेंगदाण्याचे कूट घाला. मिश्रण ढवळून घ्या नंतर पोळपाटाला तुपाचा हलका हात लावून घ्या. शेंगदाण्याच्या कूटाचे मिश्रण पोळपाटावर घाला. लाटण्याने मिश्रण पोळपाटावर सम पातळीवर लाटून घ्या, लगेच त्याच्या वड्या करा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News