Instagram टिकटॉकची कमी भरुन काढणार; पाहा नवीन फिचर केलं लॉंच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 August 2020

फेसबुकच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर एक नवीन फिचर देण्यात आले. त्याद्वारे युजर्सना पंधरा सेकंदाचा व्हिडिओ बनवता येणार आहे.

तरुणाईला वेड लावणाऱ्या टॉकॲपला आता फेसबुकने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. फेसबुकच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर एक नवीन फिचर देण्यात आले. त्याद्वारे युजर्सना पंधरा सेकंदाचा व्हिडिओ बनवता येणार आहे, त्यामुळे टिकटॉकचे ग्राहक आता इंस्टाग्रामकडे वळवण्यासाठी फेसबुकने नवीन शक्कल शोधून काढली. 

तरुणाईला कमी वेळान नवीन ओळख टिकटॉकने बनवून दिली. टिकटॉकचे काही युजर्स एक व्हिडीओमुळे स्टार बनले. सोशल मीडीयावर त्यांची चर्चा सुरु झाली. प्रसार माध्यमांनी त्यांनी दखल घेतली.  टिकटॉक ॲप चायनीज असल्यामुळे केंद्र सरकारने बंदी घातली, त्यामुळे फेसबुकने टिकटॉक सारखाच 'रिल्स' नावाचं नवीन फिचर लॉज केले आहे. यामध्ये वेगवेगळे ऑडिओ, नवीन ट्रेड, चालेंज अशा वेगवेगळे पर्याय युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर व्हिडिओ करताना बॅकग्राऊंड कलर, व्हिडिओची स्पीड कट्रोल करण्याचे एक तंत्र उपलब्ध करून देण्यात आले. पंधरा सेकंदाचा व्हिडिओ तयार केल्यानंतर तो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करता येईल. आणि क्रिएटिव्ह फिल्टर अँड म्युझिक शेअर अॅपशन वापरुन इतर सोशल माध्यमांवर पाठवता येतो, अशी सोय नवीन फिटरमध्ये करण्यात आली. 

यापूर्वीही फेसबुक 2018 साली टिकटॉकला पर्याय म्हणून 'लोसो' नावाचे अॅप लॅंच केले होते मात्र, जुलै मध्ये बंद हे अॅप बंद करण्यात आले. टिकटॉक बंद झाल्यापासून अनेक कंपन्यांनी टिकटॉक सारखे अॅप तयार केले. त्यामुळे टिकटॉकचे ग्राहक इतर अॅपकडे कळले. आता इंन्टाग्रामच 'रिल्स' हे नवीन फिचर तरुणाईमध्ये किती लोकप्रिय होईल हे येणाऱ्या काळात माहिती होईल. नवीन ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही इंस्टाग्राम ॲप मध्ये एक नवीन फिचर देण्यात आलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News