'ती' चा निष्पाप बळी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 February 2020
  • 'ती' चा निष्पाप बळी

सध्या काय चाललं आहे.  ते ऐकून आणि  पाहून मन सुन्न व्हायला झालंय. काही समजेनास झालंय. खरतर मनामध्ये भीती आणि प्रश्न गोंधळ दोन्ही आहेत . हे सर्व पाहून आम्ही महिला स्वतंत्र आहोत का?  या एकाच प्रश्नामुळे  माझं  मन घाबरलंय. 1947 साली देश स्वातंत्र्य झाला असला, तरी ती स्वतंत्र आहे का?  हा प्रश्न उभा राहतो. मग स्त्री पुरुष समानता फार दूरच राहिले.

कामांसाठी, शिक्षणासाठी माझ्या सारख्या अनेक मुली  घराबाहेर पडतात. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या धडपडत असतात. जीवाच रान करत असतात. पण हिंगणघाट सारख्या घटना पायात बंधनअसल्याचे दाखवून देत आहेत . पण ही बंधन ती कधी तोडणार. एखाद्या नरधमाच्या मनासारखं झाल नाही, तर  कोणी पेट्रोल टाकून जाळतय, तर कोणी ऍसिड टाकून कुरूप करतय.

तिला पण स्वतःची मत आहेत, मन आहे. मग का जबरदस्ती केली जाते.   पण तीचा निर्णय सहन होत नसेल तर तुम्ही मर्द म्हणून जगण्याच्या लायकीचे नाही . थोडा मर्दपणा दुखावला तर हत्या होते. एसिड टाकले जाते.पेट्रोल टाकलं जातय. ही विकृती कधी संपणार आणि कधी मुली बिनधास्त जगणार समजत नाहीये.

- प्रियांका मोरे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News