कमवा शिका योजनेचा निधी वाटप करताना महाविद्यालयांवर अन्याय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 June 2020

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वपुर्ण योजना आहे. तसेच विद्यापीठातील संलग्न असलेल्या महाविद्यालयात कमवा आणि शिका ही योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून दररोज ३ ते ४ तासांच्या दरम्यान काम करून घेतले जाते. या कामातून विद्यार्थ्यांचा भोजनालय किंवा अन्यखर्च भागवला जातो. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निधीच्याबाबत अन्याय होत असल्याचे उघडकीस आले आहे. कमवा शिका योजनेचा निधी वाटप करताना महाविद्यालयांवर अन्याय होत आहे. विशेष म्हणजे पाच हजाराच्या दरम्यान विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी अडीच कोटी निधी, तर पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेणा-या महाविद्यालयाला फक्त साडेचार कोटीची तरतूद केली जात आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी जास्त उपलब्ध व्हायला हवा अशी मागणी अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाच्या अधिसभेत केली आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वपुर्ण योजना आहे. तसेच विद्यापीठातील संलग्न असलेल्या महाविद्यालयात कमवा आणि शिका ही योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून दररोज ३ ते ४ तासांच्या दरम्यान काम करून घेतले जाते. या कामातून विद्यार्थ्यांचा भोजनालय किंवा अन्यखर्च भागवला जातो. 

गुरूवारी सावित्रीबाई फुले विद्यापीठाची अधिसभा होती. त्यावेळी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दरम्यान अधिसभा सदस्य बागेशी मंठाळकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पातील निधीची तरतूद ही खूपच कमी असल्याचे निर्दशनास आणले. संलग्न असलेली महाविद्यालये विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देतात, पण कमवा व शिका योजनेत योग्य निधी दिला जात नाही. 

सावित्रीबाई फुले विद्यापीठात ५ हजार विद्यार्थी शिकतात, त्यांच्यासाठी अडीच कोटींची तरतूद आहे. तर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात ५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना निव्वळ साडेचार कोटीचा निधी दिला जात आहे. हा निधी वाढवून मिळावा यासाठी मागणी करण्यात आली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News