कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 April 2020

रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ऑनलाइन पद्धतीने निधी जमवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला.

नांदेड : देशातील तसेच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ऑनलाइन पद्धतीने निधी जमवून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला दिला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्फूर्तीने एकत्र येऊन कोव्हिड-१९ या माध्यमातून जमा आपापल्या परीने निधी जमा केला.

विशेष म्हणजे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणे शक्य नाही. अशा परिस्थितीत मानवी समाजावर आलेल्या आपत्ती विरोधात लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी स्वयंसेवक अमोल सरोदे यांच्या पुढाकारातून घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी 4704 रु. कोरोनाग्रसतांसाठी मदत निधी जमा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हिड-१९ पाठवला आहे. त्याचबरोबर अमोलने प्रत्येक एनएसएस स्वयंसेवकाशी संपर्क साधून आपण स्वत: काळजी घेत आपले कुटुंब व आपल्या परिसरातील लोकांना जागरूक करत मदत करावी आणि सर्वांनी घरीच राहावे, असे आवाहन केले.

यासाठी आष्टगाथा कावळे, कुशल देशमुख, सागर राजवाडे, मनिषा कांबळे, कल्याणी आवचार, विनोद साळवे, ओमकार मठपती, मंगेश ससाणे, तय्यब सय्यद, विशाखा साळी, ऐश्र्वर्या वाठोरे, संतोष साखरे, शशिकांत चावरे, अखिल पठाण, किरण सुर्यवंशी, स्वरदीप शेळके, विद्याचरण, राजाराम, संकेत बागल, अविनाश, पवन धुमाळ आदींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News