मृगगड संवर्धनासाठी चिमुकल्यांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020

सर्व क्षेत्रात अग्रणी असलेली स्त्री दुर्गसंवर्धनाच्या या मेहनतीच्या कामातही सक्षमपणे काम करू शकते हे या महिलांनी सिद्ध केले. या मोहिमेत खऱ्या अर्थाने नारी शक्ती एकत्र येऊन काय करू शकते याचा प्रत्यय आला.

पाली : मृगगड किल्ला सुधागड तालुक्‍याच्या इतिहासाचा अभेद्य साक्षीदार आहे. त्याला जपण्याचे काम दुर्गवीर प्रतिष्ठानमार्फत गेली चार वर्षे सुरू आहे. श्रमदान मोहिमेचा भाग म्हणून नुकतेच दुर्गवीर तर्फ येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम आयोजित केली होती. यामध्ये स्त्रिया व लहानग्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मोहिमेचे नेतृत्व प्रशांत डिंगणकर यांनी केले. पाण्याची टाकी, गडावरील वास्तू व मंदिर परिसरातील स्वच्छता केली. मोहिमेचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकूण उपस्थित असलेल्या २१ सभासदांपैकी स्त्रियांची संख्या जास्त होती. शौर्य हसूरकर, गार्गी डिंगणकर, गौरी थोरा या ५-६ वर्षांच्या मुलांचाही सहभाग होता. त्यांनीही आपल्या चिमुकल्या हातांनी दुर्गसंवर्धनास हातभार लावला.

उज्ज्वला शिखरे, प्रियंका म्हात्रे, दिव्यता घाणेकर, प्रणिता उत्तेकर, कल्पना निवाते, संस्कृती हसुरकर, विनिता पनवेलकर, किरण नितीन पाटोळे, शीतल घुगारे, मंगल यादव यांनी स्त्री शक्तीचे महात्म्य दाखवून दिले. तसेच सर्व क्षेत्रात अग्रणी असलेली स्त्री दुर्गसंवर्धनाच्या या मेहनतीच्या कामातही सक्षमपणे काम करू शकते हे या महिलांनी सिद्ध केले. या मोहिमेत खऱ्या अर्थाने नारी शक्ती एकत्र येऊन काय करू शकते याचा प्रत्यय आला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News