कुंडगुळे (हिरव्या मिरचीच्या पुऱ्या)

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020
  • साताऱ्याची हिरव्या मिरचीच्या तिखट पुऱ्यांचा आस्वाद घ्या. 
  • थंडी मध्ये बाहेर जाताना नक्की बनवा. 
     

साहित्य 

• ३~४ हिरव्या मिरच्या 
• ७~८ लसूण पाकळ्या 
• १ चमचा जिरं 
• १/२ चमचा ओवा 
• १ १/२ कप गव्हाचं पीठ / कणिक 
• १/४ कप ज्वारीचं पीठ 
• १/४ कप बेसन 
• १/२ चमचा हळद 
• चवीनुसार मीठ 
• बारीक चिरलेली कोथिंबीर 
• पाणी 
• तळण्यासाठी तेल

 

कृती- दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यात पाव कप जव्हारीचं पीठ घालायचं आणि त्यात पाव कप बेसन घाला. हळद अर्धा चमचा मीठ चवीपुरतं आणि हिरव्या मिरचीचं वाटण घाला. आणि बारीक चिरलेली कोथींबीर टाका. हे सगळं मिश्रण मिक्स करून त्यात पाणी घालून कालवून घ्या. नंतर त्याचे गोळे करून लाटून घ्या. लाटताना त्या पिठाला तेल लावून लाटा आणि छान अश्या बारीक पुऱ्या लाटून मस्त पैकी गरम तेलात टाळून घ्या आणि छान अश्या खुसखुशीत पुऱ्या आपल्या तयार होतात. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News