INDvsNZ : भारत दुसऱ्या कसोटी सामन्यातही अपयशी ठरला

यिनबझ टीम
Monday, 2 March 2020

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारताला कसोटी मालिकेत दुसरी हार पत्करावी लागली आहे. न्यीझीलंडसमोर ठेवलेल्या 132 धावांचे लक्ष त्यांनी सहजरित्या पार करत न्यूझीलंडने हा विजय मिळवला आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारताला कसोटी मालिकेत दुसरी हार पत्करावी लागली आहे. न्यीझीलंडसमोर ठेवलेल्या 132 धावांचे लक्ष त्यांनी सहजरित्या पार करत न्यूझीलंडने हा विजय मिळवला आहे.

वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर झालेल्या पहिल्या सामन्यानंतर भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना हेगले ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला. मात्र न्यूझीलंडच्या कोणत्याच मैदानावर भारताला यश गवसले नाही. दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी न्यूझीलंडने भारताला मात दिली. 

पहिल्या डावात भारताने 242 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडने पहिल्या डावातल्या दुसऱ्या फेरीत 7 धावांनी आघाडी घेत 235 धावा केल्या. दुसर्‍या फेरीत भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि संघ 124 धावांवर पुर्ण बाद झाला. केवळ 132 धावांचे लक्ष्य किवी संघाने 36 षटकांत तीन गडी गमावून पुर्ण केले.

दुसऱ्या डावात न्यूझीलंडची टॉम बाल्डेल आणि टॉम लॅथम ही जोडी खेळत होती, त्यावरून तर असे वाटत होते की न्यूझीलंड हा सामना बिना विकेट्स जिंकू शकेल. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर उमेश यादवने लाथमला बाद करून भारताला पहिला विकेट मिळवून दिला. लाथमने 10 चौकारांच्या मदतीने 74 चेंडूत 52 धावा केल्या होत्या तर त्यानंतर तिसऱ्या स्थानावर खेळण्यासाठी आलेल्या कर्णधार केन विल्यमसन हा पाच धावा काढून जसप्रीत बुमराहचा शिकार ठरला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News