INDvsNZ 21 सामने झाले, विराट कोहलीचं एकसुध्दा शतक नाही

यिनबझ टीम
Saturday, 29 February 2020

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंड दौर्‍यावर केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. गेल्या 21 डावापासून कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकसुध्दा शतक करता आले नाही.

न्यूझीलंड दौर्‍यावर विराट कोहलीचा खराब खेळ सुरू आहे. क्राइस्टचर्च कसोटीच्या पहिल्या डावात फक्त तीन धावा केल्याने विराट कोहली बाद झाला.

सामन्याच्या पहिल्याच दिवशी कोहलीला टीम साऊथीने LBW आउट केले. कोहलीने चेंडू बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला पण तो लाइन चुकला.

कोहलीने आतापर्यंत 13 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये LBW दिल्यानंतर डीआरएस घेतला आहे आणि दोनदाच तो बरोबर ठरला. बाकीच्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटच्या पाच डावात त्याने केवळ 48 धावा केल्या आहेत.

कोहलीने वेलिंग्टन कसोटीत केवळ 21 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या या दौर्‍यावर त्याने एकदाच अर्धशतकाचा आकडा पार केला आहे. एकदिवसीय मालिकेत कोहलीने 75 तर टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या चार सामन्यात फक्त 105 धावा करता आल्या.

मागील 21 डावांत कोहलीला शतक करता आले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोलकातामध्ये त्याने बांगलादेशविरूद्ध 136 धावा फटकावल्या होत्या, मात्र त्यानंतर त्याच्याकडून एकही शतक करता नाही आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सौदीने दहा वेळा कोहली बाद केले आहे. कसोटीत ही तिसरी वेळ आहे, तर एकदिवसीय सामन्यात 6 आणि टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एकदा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News