video : ती रस्त्यावर डान्स करून सांगते ट्राफिकचे नियम

यिनबझ टीम
Tuesday, 19 November 2019

इंदौरच्या रस्त्यावर डान्स करून नियम सांगणारी ही मुलगी आहे पुण्याच्या सिंबायोसिस कॉलेजची 

ही मुलगी रस्त्यावर डान्स करून लोकांना रहदारीचे नियम समजावून सांगत आहे, पाहा व्हिडिओ

इंदौर - वाहतूक पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक पोलीस महिला रस्त्यावर लोकांना अनोख्या पध्दतीने जागरूक करताना दिसत आहे. ट्रॅफिक पोलिसांना मदत करणार्‍या या मुलीचे नाव "शुभी जैन". ती पुणे येथील सिंबायोसिस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. 

 

व्हिडिओमध्ये "शुभी जैन" केवळ रहदारी हाताळताना दिसत नाहीत, तर लोकांना रहदारीचे नियमदेखील पाळण्यासाठी जागरूक करताना दिसत आहेत. इंदौरच्या मार्गावर "शुभी जैन" लोकांना हेल्मेट घालण्यासाठी तसेच सीट बेल्ट लावण्यासाठी आवाहन करताना दिसत आहे. ट्राफिकचे नियम सांगण्याच्या या नव्या पध्दतीमुळे प्रवाशीदेखील शुभी जैनचे ऐकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News