आईच्या साड्यांपासून या अभिनेत्रीने तयार केले इंडो वेस्टर्न ड्रेस

सकाळ वृत्त सेवा ( यिनबज )
Thursday, 11 April 2019

साड्यांपासून ड्रेस बनवल्यानंतर चित्रपटसृष्टीतील फॅशन डिझायनर्सकडून तसेच माझ्या चाहत्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यामुळे या कामासाठी मला अधिकाधिक प्रोत्साहन मिळत आहे

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी एकत्र मिळून त्यांच्या ‘तेजाज्ञा’ या फॅशन ब्रॅण्डला सुरुवात केली. अभिनयाची आवड जोपासत दोघीही हा नवा कारभार सांभाळतात. आता अभिनेत्री पल्लवी पाटीलही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवणार असल्याची चिन्ह दिसताहेत. नुकतंच पल्लवीने स्वतः तिच्या आईच्या साड्यांपासून ड्रेस डिझाईन केले आहेत. फॅशन डिझाइनिंगचा कोणताही कोर्स न करता इंडो-वेस्टर्न पद्धतीचे ड्रेस तिने तयार केले आहेत. विशेष म्हणजे स्वतःच डिझाईन केलेले ड्रेस परिधान करून तिने विशेष फोटोशूटही केले आहे. पल्लवी म्हणते, ‘माझी आई तिची प्रत्येक साडी नेहमीच जपून ठेवते. त्यामुळे आईने जपून ठेवलेल्या साड्यांपासून ड्रेस बनवण्याची कल्पना माझ्या डोक्‍यात आली. साड्यांपासून ड्रेस बनवल्यानंतर चित्रपटसृष्टीतील फॅशन डिझायनर्सकडून तसेच माझ्या चाहत्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यामुळे या कामासाठी मला अधिकाधिक प्रोत्साहन मिळत आहे.’ आता पल्लवीही तिचा नवा फॅशन ब्रॅण्ड सुरू करणार का हे पाहाचंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News