कॉन्टॅक्‍ट लेन्सद्वारे रोगांचे संकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 September 2019
  • इत्यंभूत अशी माहिती ही लेन्स वायफाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळते. यानंतर संबंधित डॉक्‍टर्स शरीराला जी काही औषधे आहेत, ती देऊ शकतात.

आपले डोळे म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसा आहे, असे म्हटले जाते. डोळे अनेक गोष्टी सांगतात. ते आपल्या शरीरातील अनेक रहस्ये बाहेर काढतात. शरीरात कोणता रोग आहे, ते डोळ्यांद्वारे समजते. यासाठी बायो सेन्सिंग कॉन्टॅक्‍ट लेन्सची निर्मिती केली. ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधक ग्रेगरी हर्मान यांनी याबद्दलचे संशोधन केले आहे. डोळ्यांमध्ये अनेक विद्युत रासायनिक प्रक्रिया घडत असतात. या प्रक्रियेत अनेक घटक कार्यरत असतात. रक्तातील शर्करा असते. अन्य घटकांप्रमाणे ही शर्करा अतिशय महत्त्वाची असते. ग्रेगरीने बायो सेन्सिंग लेन्समध्ये इंडियम गॅलियम झिंक ऑक्‍साईडची प्रक्रिया केली.

जेव्हा ही लेन्स डोळ्यांत ठेवली जातात तेव्हा त्यातून रक्तातील शर्करा, अन्य घटकांचे प्रमाण तर समजते; पण शरीरात कोणता रोग ठाण मांडून बसला आहे, तेही समजते. डोळ्यांतून येणारे पाणी रक्ताच्या शर्करेमध्ये गेले की, लेन्सद्वारे सर्व माहिती ही वायफाय, ब्लू टूथच्या माध्यमातून स्क्रिनवर येते. इत्यंभूत अशी माहिती ही लेन्स वायफाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळते. यानंतर संबंधित डॉक्‍टर्स शरीराला जी काही औषधे आहेत, ती देऊ शकतात.

असे रोगाआधी डोळ्यांच्या माध्यमातून समजले, तर संबंधित व्यक्ती काळजी घेईल. योग्य ते औषधोपचार घेईल. निरोगी आयुष्य व्यतित करेल. वायफाय तंत्रज्ञान हे किती सूक्ष्म पद्धतीने काम करू शकते, हे पाहिले की, मन थक्क होऊन जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News