कोरोना रूग्णांच्याबाबत भारताचा नवा रेकॉर्ड, इतके रूग्ण सापडले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

कोरोना रूग्णांच्याबाबत भारताचा नवा रेकॉर्ड, इतके रूग्ण सापडले

कोरोना रूग्णांच्याबाबत भारताचा नवा रेकॉर्ड, इतके रूग्ण सापडले

मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग देशात मोठ्या प्रमाणात झाला. त्याला रोकण्यात अद्याप सरकारला यश आलेलं नाही असं स्पष्ट दिसतंय, कारण दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. गुरूवारी तर कोरोनाच्या रूग्णांनी नवा रेकॉर्ड केला. एका दिवसात तब्बल ७५, ७६० रूग्ण आढळून आले. जगभरात इतक्या झपाट्याने कुठेचं रूग्ण आढळले नव्हते. त्याचबरोबर बरे होणा-या रूग्णांची संख्याही ७४ टक्के आहे.

देशभरात आत्तापर्यंत कोरोनाचे ३३,१०,३२४ इतके रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार गुरूवारी १,०२३ कोरोना रूग्णांचा मृत्यू झला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण आकडा ६०,४७२ इतका झाला आहे. देशभरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३३,१०,३२४ झाली आहे.  या आजारातून २५,२३,७७१ जण पूर्णपणे बरे झाले
आहेत.

सध्या देशात ७,२५,९९१ रूग्णांवरती उपचार सुरू असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 21.93% इतकी आहे. कोरोना चाचण्याचे देशात वाढत असलेल्या प्रमाणामुळे रूग्णांवरती वेळेत उपचार सुरू आहेत. यामुळे मृत्युदर 1.83% इतका कमी राखण्यात सरकारी यंत्रणांना यश आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News