प्राग ओपनमध्ये भारतीयांचे आव्हान संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020
  • एटीपी चॅलेंजर प्राग ओपनमध्ये दुहेरी स्पर्धेत भाग घेणाऱ्या तिन्ही खेळाडूंचा पराभव झाल्याने भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.
  • दरम्यान, कोरोना विषाणूच्या नंतर भारतीय टेनिस खेळाडूंसाठीची ही पहिलीच स्पर्धा होती.

प्राग :- एटीपी चॅलेंजर प्राग ओपनमध्ये दुहेरी स्पर्धेत भाग घेणाऱ्या तिन्ही खेळाडूंचा पराभव झाल्याने भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या नंतर भारतीय टेनिस खेळाडूंसाठीची ही पहिलीच स्पर्धा होती. जगातील १७ व्या क्रमांकाचा आणि एकेरीत तीन वेळा ग्रॅंड स्लॅम विजेता स्टॅनिस्लास वाव्ह्रिंकाकडून सुमित नागल हरला, शिवाय दुहेरी सामन्याचेही आव्हान संपुष्टात आले. तसेच नागल आणि इल्या इवाश्‍का हे पियरे-ह्यूज हर्बर्ट आणि आर्थर रेंडरकनेककडून २-६ ४-६ ने सामना हरले आहेत. गुरुवारी झालेल्या एटीपी चॅलेंजर प्राग ओपन सामन्यात अव्वल मानांकित दिविज शरण आणि रॉबिन हासे यांना उपांत्यपूर्व फेरीत जिरी लेहेका आणि टॉमस मॅकहॅककडून ३-६ ६-७(८) असा पराभव स्वीकारावा लागला, तर एन श्रीराम बालाजी आणि त्याचा साथीदार किमर कोपेजन्स यांनाही सरळ सेटमध्ये स्टीव्हन डायझ आणि ब्लेझ रोला यांच्याविरुद्ध ४-६ ३-६ ने पराभूत केले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News