भारतीय तरुण संशोधकाने शोधली कोरोनावर लस; लवकरच औषध उपलब्ध होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020

अमेरिकेच्या संशोधकांना कोरोनावर लस शोधून काढण्यात येत आले. या संपुर्ण संशोधनाचे नेत्रृत्व भारताचा युवा संशोधन जय अशोक शेंडुरे यांनी केले आहे.

कोल्हापूर: कोरोना व्हायरस संपुर्ण देशभर पसरला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. संपुर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट पसरले आहे. कोरोना आजारावर कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे नारिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र, अमेरिकेच्या संशोधकांना कोरोनावर लस शोधून काढण्यात येत आले. या संपुर्ण संशोधनाचे नेत्रृत्व भारताचा युवा संशोधन जय अशोक शेंडुरे यांनी केले आहे. त्यामुळे जगभरात भारतीय संशोधकाचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जात आहे.
   
अमेरिकेने निर्माण केलेल्या लसीच्या प्राथमिक चाचण्या पुर्ण झाल्या आहेत. या चाचणीत कोरोनाग्रस्त रुग्ण ठणठणीत बरा झाला. काही दिवसात ही लस सर्वत्र उपलब्ध होईल असा विश्वास जयने व्यक्त केला आहे. जय शेंडुरे हा तरुण कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावचा रहीवाशी आहे. शेंडुरे कुटुंब अनेक दिवसापासून अमेरिकेत वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा जय हा अमेरिकेत तरुण संशोधन म्हणून प्रसिद्ध आहे. जयने केलेल्या नैत्रदीप कामाची दखल जगप्रसिद्ध न्यूयॉर्क टाईम्स वर्तपत्राने घेतली आहे.

 

कोरोना व्हायरस (कोव्हिड 19) विषाणूवर अमेरिकेतील ब्लू स्टडी सेंटरमध्ये संशोधन करण्यात आहे. संशोधनासाठी एक टीम बनवण्यात आली होती. टीमचे प्रमुख जय शेंडुरे या तरुण संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधक लस विकसीत करण्यात आली. काही दिवसातच ही लस रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.     

या पुर्वी जयने अनेक संशोधन केले आहेत. गर्भातील बाळाला कोणते आजार आहेत आणि ते आजार दूर करण्यासाठी ‘डीएनए ब्ल्यू प्रिंट’ नावाचे संशोधन 2012 साली केले. त्यामुळे गर्भात बाळावर उपचार केले जात आहेत. अमेरिकेत जयने मोठे यश संपादन केले आहे मात्र, जयने मातीची नाळ जोडून ठेवली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News