पॉर्न पाहण्यात भारतीय अव्वल; अमेरिका, ब्राझीलला टाकले मागे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020
  • जगातील 4 पैकी 3 लोक पाहतात पॉर्न

नवी दिल्ली: मोबाईल ही तरुणाईची मुलभुत गरज बनली आहे. मोबाईल वापरकर्त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. वेळ मिळेत तेव्हा तरुणाई मोबाईल मध्ये तोंड खुपसुन पाहत असतो. नक्की काय पाहते ही तरुणाई? 

पॉर्न संबंधीत 2019चा आहवास प्रसिद्ध झाला. त्याच झक्कादायक माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये मोबाईलद्वारे 89 टक्के भारतीय पोर्न पाहतात. 2017 मध्ये 86 टक्के भारतीय पॉर्न पाहत होते, त्यात 3 टक्के लोकांची वाढ झाली आहे.

अडल्ट एंटरटेनमेंट साइट पॉर्नहब अनुसार जगातील 4 पैकी 3 लोक मोबाईलवर पॉर्न पाहतात. याचा अर्थ डेस्कटॉप, लैपटॉप आणि सी, डी, डी. व्ही. डी यापेक्षा मोबाईलवर पॉर्न पाहण्याची संख्या अधिक आहे. मोबाईल मध्ये पॉर्न पाहण्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका दुसरा आणि ब्राझील तिसऱ्या स्थानावर आहे.

पॉर्नहबच्या ‘इयर इन रिव्यू’ रिपोर्टने खुलासा केला की, 2013 मध्ये मोबाईल वरुन पोर्न पाहण्याची संख्या 40 टक्के होती आता ती 86 टक्क्यापर्यंत वाढली आहे. इंटरनेट डाटा स्वस्त झाल्यामुळे मोबाईलवरुन पोर्न पाहण्याची संख्या वाढली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News