केएल राहुल सारख्या खेळाडूला आपण बाहेर बसवतो? - कपिल देव

यिनबझ टीम
Wednesday, 26 February 2020

सध्या भारत न्यूझीलंड दैऱ्यावर आहे. पहिल्या टी-20 मालिकेत यश मिळवल्यानंतर मात्र भारतीय संघाला ना वनडेमध्ये सुर गवसला, ना कसोटीमध्ये विजय मिळवता आला. त्यामुळे भारतीय संघावर क्रिकेट प्रेमींपासून अनेक खेळाडूदेखील सवाल उठवताना दिसत आहेत.

वेलिंग्टन - सध्या भारत न्यूझीलंड दैऱ्यावर आहे. पहिल्या टी-20 मालिकेत यश मिळवल्यानंतर मात्र भारतीय संघाला ना वनडेमध्ये सुर गवसला, ना कसोटीमध्ये विजय मिळवता आला. त्यामुळे भारतीय संघावर क्रिकेट प्रेमींपासून अनेक खेळाडूदेखील सवाल उठवताना दिसत आहेत. त्यातच न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनीदेखील टीका केली आहे. 

कपिल देव यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, 'आम्हाला न्यूझीलंडचे कौतुक करावे लागेल, कारण ते उत्तमरित्या क्रिकेट खेळत आहेत. त्यांची तीन एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमधली उत्कृष्ट कामगिरी आपण सगळ्यांनी पाहिली आहे. जर भारतीय संघाबद्दल बोलायचं झाल्यास एखाद्या संघात इतके बदल कसे काय असू शकतील, याचा विश्वासच बसत नाही. टी-20 नंतर झालेल्या प्रत्येक सामन्यानंतर नवनवीन बदल झालेले दिसून येतात, असे मत कपिल देव यांनी मांडले आहे.

कपिल देव म्हणतात की भारतीय संघात कोणीही कायम खेळाडू म्हणून दिसत नाही. या जागेविषयी सुरक्षेची जाणीव नसल्यास त्याचा परिणाम खेळाडूंच्या खेळावर जाणवू लागतो आणि तसाच काहीसा प्रकार भारतीय संघाच्या खेळावरून दिसून येत आहे. बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी मालिकेत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज पुर्णपणे अपयशी ठरताना आपण सर्वांनी पाहिले. स्वतः कोहलीनेही या अपयशाचं कारण  फलंदाज असल्याचे मान्य केले होते.

फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची बरीच मोठी यादी आपल्याकडे असूनदेखील आपण  २०० धावांचा स्कोर बनवू शकत नाही, याचा अर्थ असा आहे की आपण परिस्थितीशी जुळवून घेत नाही. आपल्याला रणनीतीवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. लोकेश राहुल सारख्या खेळाडूला आपण बाहेर बसवतो, ही कुठली रणनिती आहे, हे समजुन येत नाही. राहुलला टी -२० मालिकेत प्लेअर ऑफ द सीरिज घोषित करण्यात आले होते, त्यालाच जर कसोटी मालिकेत खेळवले असते, तर आज भारताकडे पराभवाचा शिक्का नसला असता, असे मत कपिल देव यांनी मांडले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News