भारतीय खेळाडू फिक्‍सिंग माहिती तात्काळ कळवतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 April 2020
  • लाचलुचपत प्रतिबंधक समितीचे प्रमुख अजिंत सिंग यांचे मत

नवी दिल्ली ः फिक्‍सिंगबाबतच्या सर्व कार्यप्रणालीबाबत भारतीय क्रिकेटपटू चांगलेच सजग आहेत, अधिक सुज्ञ आहेत. त्यामुळे कोणी ऑनलाईन जाळे टाकण्याचा प्रयत्न केला, तरी आपले खेळाडू लगेचच सावध होतात. त्यामुळे काहीही संशयास्पद आढळले, तर आम्हाला तत्काळ कळवतात, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक समितीचे प्रमुख अजिंत सिंग यांनी दिली.

लॉकडाऊनचा वाढलेला कालावधी आणि मैदानावर कोणतीची घडामोड होत नसल्यामुळे खेळाडूंकडून अधिक होत असलेला सोशल मीडियाचा वापर यामुळे सट्टेबाज आणि फिक्‍सर्स खेळाडूंना आपल्या जातळ्यात ओढू शकतात, अशी भीती आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक समितीचे प्रमुख अलेक्‍स मार्शल यांनी नुकतीच व्यक्त केली होती.

भारतीय खेळाडूंबाबतची स्थिती आमच्या नियंत्रणात आहे, असे अजित सिंग यांनी कळवले आहे. सट्टेबाज आणि फिक्‍सर्स कशा प्रकारे खेळाडूंशी संपर्क साधू शकतात आणि सोशल मीडियाचा कसा फायदा घेऊ शकतात, याची सर्व कल्पना आम्ही त्यांना दिली आहे, असे अजित सिंग यांनी सांगितले. ते तुमचे चाहते आहेत, असे भासवून तुमच्या ओळखीपैकी एकाचा संदर्भ देऊनही ते तुमच्याशी घसट करण्याचा प्रयत्न करू शकतील, हेसुद्धा आम्ही खेळाडूंना कळवले असल्याचे अजित सिंग म्हणाले.

कोठून होऊ शकतो संपर्क

बहुतांशी अव्वल खेळाडूंचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे हे खेळाडू सोशल मीडियावर कार्यरत असतात ट्‌विटरवर लाईव्ह प्रश्नोत्तर सुरू असतात. इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅटिंग होत असते. फेसबुक लाईव्हही सुरू असते. त्यामुळे आम्ही ऑनलाईन माहिती व संदेशांवर लक्ष ठेऊन असतो, असे अजित सिंग यांनी स्पष्ट केले.

जेवढे लक्ष ठेवता येईल, तेवढे आम्ही कटाक्ष ठेवत असतो. परंतु प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी त्या त्या ठिकाणावर आम्ही लॉकडाऊनमुळे जाऊ शकत नाही, परंतु काहीही संयशास्पद आढळले, तर त्याची नोंद आम्ही करतो आणि लॉकडाऊन उठल्यावर प्रत्यक्ष तेथे जाऊन चौकशी करू शकतो, असा इशाराही अजित सिंग यांनी दिला.

भारतीय खेळाडू प्रामाणिक

मी गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाबरोबर आहे. सध्याचे सर्व खेळाडू प्रामाणित आणि सज्जन आहे. आपल्या जबाबदारीची त्यांना चांगली जाणीव आहे, असे मतही अजित सिंग यांनी व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News