भारतीय इंटरनेट सेवेला 25 वर्ष पूर्ण; 9.6kbps साठी एक लाख रुपये भाडे, पाहा रेट कार्ड 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020

आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली, या पंचवीस वर्षात इंटरनेटमध्ये अनेक बदल झाले. सर्वप्रथम भारतामध्ये विदेश संचार निगम लिमिटेड सरकारी कंपनीने इंटरनेट सेवा सुरू केली

मुंबई : 15 ऑगस्ट १९९५ रोजी भारतात इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. यापूर्वी इंटरनेट सेवा होती मात्र ती संशोधन आणि शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित होती. १९५ नंतर सार्वजनिक इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली, या पंचवीस वर्षात इंटरनेटमध्ये अनेक बदल झाले. सर्वप्रथम भारतामध्ये विदेश संचार निगम लिमिटेड सरकारी कंपनीने इंटरनेट सेवा सुरू केली, त्यानंतर काही प्रायव्हेट संस्थांना इंटरनेट सेवा देण्याची मान्यता सरकारने दिली, त्यानंतर १९९८ पासून खाजगी कंपन्यांनी इंटरनेट देण्यास सुरुवात केली.

पहिली प्रायव्हेट सेवा देणारी सत्यम इन्फोसिस कंपनी 

भारतामध्ये १९९६ साली रेडिफ कंपनीने इंटरनेट सेवा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर नोकिया कंपनीने इंटरनेटवर चालणारा पहिला फोन नोकिया ९००- कम्युनिकेशन नावाने लॉन्च केला. त्यानंतर १९९८ साली सत्यम इन्फोसिस कंपनीने खाजगी प्रोव्हायडर सर्विस देण्यास सुरुवात केली. गुगलने सुरुवातीला याहू कंपनी विकत घेऊन भारतात इंटरनेट सेला सुरू केली. 

सर्वांधित महाग सेवा

भारतामध्ये ९.६ केबीपीएस इंटरनेटसाठी सुरुवातीला २ लाख ४० हजार रुपये वार्षिक भाडे द्यावे लागायचे, एवढे पैसे देऊनही इंटरनेटची स्पीड खूप कमी होती. प्रायव्हेट क्षेत्रांमध्ये १२८kbp केबीपीएससाठी तीस लाख रुपये वर्षाला मोजावे लागायचे. हाच खर्च कमर्शियलसाठी २५ लाख रुपये होता. नॉन कमर्शियल ९.६ केबीपीएस इंटरनेट सेवेसाठी वर्षाला पंधरा हजार रूपये मोजावे लागायचे. त्यावेळी ही सेवा खूप महाग होती. फक्त वैयक्तिक रित्या वापरता येत होती इतरांना त्याची जोडणी करता येत नव्हती.  ज्यांनी कनेक्शन घेतले त्यांनाच वापरण्याची सोय होते. कमर्शियल लाईनसाठी ९.६ केबीपीएसला दोन लाख ४० हजार रुपये वर्षाला द्यावे लागायचे तर १२८kbp ला दहा लाख रुपये द्यावे लागायचे.

लीज्ड लाईट पेक्षा डायल कनेक्शन स्वस्त 

लीड लाईनच्या पेक्षा डायल कनेक्शन हे स्वस्त मिळत होते. व्यवसायिक योजना 9.6 केबीपीएससाठी एका कनेक्शनला पाच हजार रुपये मोजावे लागायचे, तर नॉन कमर्शियलसाठी पंधरा हजार रुपये. कमर्शियल आणि एक्सपोर्टसाठी 25 ते 30 हजार रुपये द्यावे लागायचे. 

पाहा रेट कार्ड

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News