व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये वीस वर्षांनंतर भारतीय चित्रपट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या “द डिसायपल” या मराठी चित्रपटाची मानाच्या ७७ व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पर्धा विभागात निवड झाली आहे.
  • तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे.

मुंबई :- दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या “द डिसायपल” या मराठी चित्रपटाची मानाच्या ७७ व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पर्धा विभागात निवड झाली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. त्यातही हा मराठी चित्रपट असल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी गौरवाची बाब ठरली आहे.

चैतन्य ताम्हाणेने आपल्या ‘कोर्ट’ या चित्रपटाद्वारे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. हा चित्रपट अनेक पुरस्कार सोहळे तसेच चित्रपट महोत्सवात गौरविण्यात आला होता. भारतातर्फे ऑस्करसाठीही हा चित्रपट पाठविण्यात आला होता. आता चैतन्य “द डिसायपल” चित्रपटामुळे पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. याचे कथानक मुंबईत घडते. चित्रपटामध्ये भारतीय शास्त्रीय गायक आदित्य मोडक प्रमुख भूमिकेत असून, तबलावादक अनिश प्रधान यांचे संगीत सिनेमाला आहे. नरेन चंदावकर यांनीदेखील संगीत तयार करून ते प्री-मिक्‍स केले आहे.
 

भारतासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. आपल्याला शास्त्रीय संगीताचे खूप मोठे देणे लाभले आहे. हा चित्रपट एका शिष्याची अनोखी सांगीतिक गोष्ट सांगतो.
- चैतन्य ताम्हाणे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News