टेनिस फिक्‍सिंगचा सूत्रधार भारतीय; ऑस्ट्रेलिया पोलिसांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

टेनिस या खेळातील फिक्‍संगच्या मोठ्या रॅकेटचा दांधीवाल सूत्रधार असल्याचे व्हिक्‍टोरिया पोलिसांनी शोधून काढल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील सिडनी मॉर्निंग हेराल्डने गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध केले होते.​

नवी दिल्ली : महत्त्वाच्या टेनिस स्पर्धांतील फिक्‍सिंग रॅकेटचा सूत्रधार भारतीय वंशाचा रवींद्र दांधीवाल याला ऑस्ट्रेलिया पोलिसांनी रडावर आणले आहे. त्यामुळे बीसीसीआयही सावध झाली असून त्याच्या कारवायांवर लक्ष ठेऊन आहे.

दांधीवाल हा मूळचा चंडीगडचा आहे. क्रिकेटच्या फिक्‍सिंगमध्ये त्याने शिरकाव केला आहे का, याची माहिती आम्ही घेत असल्याचे बीसीसीआयचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले. टेनिस या खेळातील फिक्‍संगच्या मोठ्या रॅकेटचा दांधीवाल सूत्रधार असल्याचे व्हिक्‍टोरिया पोलिसांनी शोधून काढल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील सिडनी मॉर्निंग हेराल्डने गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध केले होते. त्यामुळे बीसीसीआयही सावध झाली आहे.क्रिकेटमधील फिक्‍सिंगबाबत दांधीवालचे अद्याप नाव आलेले नाही. त्याचा प्रत्यक्ष सहभाग कोठे सापडलेला नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही, असे अजित सिंग यांनी सांगितले.

दांधीवालचा क्रिकेट संबंध

दांधीवालचा क्रिकेट फिक्‍सिंगमध्ये सध्या तरी कोणता थेट दुवा सापडलेला नसला, तरी त्याने क्रिकेटशी जवळीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चंडोगडमघ्ये त्याने एक खासगी लीग घेतली होती; परंतु तिला बीसीसीआयची परवानगी नव्हती. दोन-तीन वर्षांपूर्वी त्याला भारतात अशीच एक लीग घ्यायची होती, परंतु बीसीसीआयने परवानगी नाकारली होती, अशी माहिती अजित सिंग यांनी दिली.

दांधीवाल प्रामुख्याने देशाबाहेर फिक्‍सिंगच्या कारवाया करत असल्याचे सांगताना अजित सिंग म्हणाले, दोन वर्षांपूर्वी तो अफगाण प्रीमियर लीगशी संबंधित होता. दोन-तीन वर्षांपूर्वी नेपाळ आणि बॅंकॉक लीगमध्येही त्याचे नाव आले होते; पण या सर्व लीग आपल्या कक्षेत येत नसल्यामुळे आपण कारवाई करू शकत नाही; मात्र त्याच्यावर लक्ष ठेऊन आहोत.

आणखी दोन भारतीय फिक्‍सिंगवर गुन्हा

मेलबर्नमध्ये राहत असलेल्या राजेश कुमार आणि हरसमिरत सिंग यांना गेल्या आठवड्यात मेलबर्न न्यायदंडाधिकाऱ्यासमोर उभे करण्यात आले होते. फिक्‍सिंगच्या माध्यमातून त्यांनी 3 लाख 20 हजार डॉलर कमण्याचा प्रयत्न केला होता.

दांधीवालने आपल्या देशात फिक्‍सिंग केल्याची नोंद नाही. ऑस्ट्रेलिया किंवा इजिप्तसारख्या देशात त्याने कारवाया केल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याचे गुन्हे भारतीय पोलिसांच्या न्यायकक्षेत येत नाही.
- अजित सिंग, बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News