पोटाची चरबी कमी करण्यासाठी जेवणातले सोपे आणि साधे पदार्थ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात का ? काळजी करू नका. आता आम्ही तुम्हांला भारतीय जेवणातले सोपे आणि साधे पदार्थ सांगणार आहोत. हे पदार्थ वजन घटवण्यासाठी खूप मदत करतात.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात का ? काळजी करू नका. आता आम्ही तुम्हांला भारतीय जेवणातले सोपे आणि साधे पदार्थ सांगणार आहोत. हे पदार्थ वजन घटवण्यासाठी खूप मदत करतात.

कारले : कारल्याच्या भाजीत फॉस्फरस, जस्त, फोलेट, मॅग्नेशियम, मॅगनीझ आणि पोटॅशियम  ही जीवनसत्वे आढळतात.  शरीरातील रक्तस्त्रावातील साखरेची पातळी मर्यादित ठेवतात आणि या भाजीत ९० टक्के पाणी असते. तसेच १००  ग्रॅम कारल्यामध्ये ३४ कॅलरीज असतात.

बीट : बीट खाल्ल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. बीटमध्ये पचनक्रिया वाढविण्यासाठी मदत करणारे खनिजे आणि पोषक तत्त्वे असतात. १०० ग्रॅम बीटमध्ये ४३ कॅलरीज असतात. 

दालचिनी : दालचिनी ही रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदय आणि रक्तवाहिनी संदर्भातल्या समस्या कमी करण्यासाठी मदत करते. . शरीरातल्या चरबीवर दालचिनी प्रभावीपणे काम करते. 

मूग डाळ : मूग डाळीत  व्हिटामिन ए, सी, बी, ई, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते.  जुनी मूग डाळ ही शरीरासाठी सर्वांत चांगली त्यामुळे प्रोटीन्स मिळतात.  मूग डाळ खाल्ल्याने पोट हलके वाटते. १०० ग्रॅम मूग डाळीतून ३४७ कॅलरीज मिळतात. 

हळद : हळदीची ओळख म्हणजे अॅन्टीसेप्टिक अशी आहे.  प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरामध्ये हळद ही प्रमुख भूमिका बजावते.  जेव्हा अपचन, पोट दुखीसारख्या समस्या उद्भवतात तेव्हा हळद खूप फायदेशीर असते.

अक्रोड : अक्रोडमध्ये  व्हिटामिन A, व्हिटामिन B, व्हिटामिन c, व्हिटामिन B12, व्हिटामिन D जास्त प्रमाणात असते. अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात  प्रोटीन असते तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉस्फरस, कॉपर, सेलेनियमही  अधिक  असतात. मधुमेहाच्या रूग्णासाठी अक्रोड खूप फायदेशीर ठरतात. 

पालक : हिरव्या पालेभाजीत व्हिटामिन के, व्हिटामिन ए, फोलेट, लोह, कॅल्शियम, व्हिटामिन सी, फायबर, प्रोटीन आणि यांसारखी पोषकतत्वे आढळतात.  पालेभाजीमध्ये  फायबर जास्त असते. पालेभाजीमुळे पोटाचा त्रास उद्भवत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही.  १०० ग्रॅम पालक भाजीत 23 कॅलरीज असतात. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News