'या' विशिष्ट हेतूनं 'हे' भारतीय जोडपं करतय देशभर भ्रमंती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 January 2020

अवयवदानची जनजागृती करण्यासाठी अमेरिकन- भारतीय जोड्यान 400 दिवसापासून जगभ्रमंती करत आहे. जाणून घेऊया अशा अनोख्या जोडप्याविषयी.

आपण कोणाला नवीन जीवनदान देऊ शकतो. जनतेच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करु शकतो. पु्न्हा एकदा जग दाखऊ शकतो. अवयवदान करुन दुसऱ्याचे जीवन पुन्हा एकदा फुलवू शकतो. या विशिष्ट होतूनं अवयवदानची जनजागृती करण्यासाठी अमेरिकन- भारतीय जोड्यान 400 दिवसापासून जगभ्रमंती करत आहे. जाणून घेऊया अशा अनोख्या जोडप्याविषयी.

अवयवदान जनजागृती

पती अनिल श्रीवास्तव आणि त्यांची पत्नी दीपाली श्रीवास्तव यांनी अवयवदान जनगाजृतीसाठी देशभर भ्रमंती करत आहेत आणि अवयवदान जनजागृती अभियान जगभर राबवत आहे. अनिलने आपल्या भावाला किडनी दान केली आणि अवयवदान जनजागृती अभियानाला सुरुवात केली. जास्तीजास्त लोकांनी अवयवदान कराव हे मुख्य हेतू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिलने 'गिफ्ट ऑफ लाइफ एडवेंचर' अभियानाची सुरुवात केली, अभियानाच्या माध्यामातून अवयवदान जनजागृती करत आहेत.

धक्कादायक! 26 करोड फेसबुक युजर्सचा पर्सनल डाटा लीकhttps://www.yinbuzz.com/facebook-news-26-million-facebook-users-personal-data-leaked-23485 

43 देशात पोहचल अभियान

'अवयवदान महान दान' आहे. अवयवदानातून आपण लोकांना जीवदान देऊ शकतो. अनिल आणि दीपाली या जोडप्यांनी 43 देशात भ्रमंती केली आणि 400 दिवस रस्त्यांवर मुक्काम केला. अनिलने आतापर्यंत 73 हजार लोकांना भेटी दिल्या आहेत. 

अवयवदान जनजागृती अनोखी पद्धत

400 दिवस रस्त्यांवर राहून अवयवदान विषयी लोकांच्या मनात असलेला गैरसमज हे जोडप दूर करत आहे. जगतभरात अवयवदानाचे कायदे आणि नियन लोकांना समजून सांगत आहे. अनिल आणि दीपाली दोघेही एका कारमध्ये स्वयंपाक बनवतात आणि कारमध्येचं राहतात. एक वर्षापासून रस्त्यावर जीवन जगत आहेत. त्यांनी 1 लाख किलोमिटरचा प्रवास केला आहे. 

रेडीओ टॉक शोमध्ये अंकर

अमेरिकेच्या सिंडिकेटेड रेडियो टॉक शोमध्ये अनिलने 1997 ते 2006 या कालावधित 'vaice of anil' 'आनिलचा आवाज' नावाने कार्यक्रम केले. हा टॉक शो प्रचंड गाजला, टॉक शोची नोंद लिंम्का बुक ऑफ रोकॉर्ड मध्ये झाली होती.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News