भारतीय कंपन्यांमध्ये BOSS म्हणून महिलांचे प्रमाण जास्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 14 December 2019

मध्यम पातळीवरील पदांवर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण २० टक्के आहे. कनिष्ठ पातळीवर सर्वाधिक ३८ टक्के महिला आहेत. ६० कंपन्यांचा अभ्यास करून हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भारतीय कॉर्पोरेट जगतात महिलांचे प्रतिनिधित्व पाच वर्षांत वाढून २१ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर गेले आहे, असे व्यवस्थापन सल्लागार संस्था ‘झिनोव’ने ‘इंटेल इंडिया’च्या साह्याने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. बिगर-तांत्रिक क्षेत्रात महिलांना सर्वाधिक ३१ टक्के प्रतिनिधित्व असून, तांत्रिक क्षेत्रात ते २६ टक्के आहे. सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व स्थानी मात्र महिलांचे प्रमाण अजूनही कमीच, केवळ ११ टक्के आहे.

मध्यम पातळीवरील पदांवर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण २० टक्के आहे. कनिष्ठ पातळीवर सर्वाधिक ३८ टक्के महिला आहेत. ६० कंपन्यांचा अभ्यास करून हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. यात जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी), तंत्रज्ञान सेवा पुरवठादार आणि स्टार्टअप यांचा समावेश आहे. संघटनात्मक धोरणे आणि पद्धती यांचेही विश्लेषण यात करण्यात आले आहे. अहवालानुसार, कंपन्यांच्या संचालक मंडळावर २०१२ मध्ये महिलांचे प्रमाण अवघे ५ टक्के होते. २०१८ मध्ये ते वाढून १३ टक्के झाले आहे.

संचालक मंडळावर किमान एक महिला प्रतिनिधी हवी, असे बंधन घातल्यामुळे ही संख्यावाढ झाली आहे. अहवालात म्हटले आहे की, मोठ्या कंपन्यांत महिलांना सर्वाधिक ३३ टक्के प्रतिनिधित्व आहे.   महिलांचे प्रमाण स्वदेशी ‘एमएनसीं’मध्ये ३० टक्के, तर बिगर एमएनसींमध्ये ३१ टक्के आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News