भारतीय लष्कराला मिळणार नवे मुख्यालय; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • हे लष्करभवन मोठ्या क्षेत्रात उभं राहणार आहे. यामध्ये कॉम्प्लेक्स तसेच पार्किंगची देखील सुविधा करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय लष्करासाठी नवं भवन उभारण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भूमिपूजन पार पाडण्यात आले. दिल्ली येथे उभारण्यात येणारे हे भवन उभारण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागणार आहे. साधारणतः ७.५ लाख वर्गमीटरच्या क्षेत्रात हे बांधण्यात येणार आहे. या मुख्यालयात विविध कार्यालये असणार आहेत. अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असं हे मुख्यालय असणार आहे. 

नव्या मुख्यालयात ६ हजारांपेक्षा अधिक कार्यालयांची व्यवस्था असणार आहे. सोबतच नारिकांसाठी देखील विशेष कार्यालय असणार आहे. सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे लष्करभवन मोठ्या क्षेत्रात उभं राहणार आहे. यामध्ये कॉम्प्लेक्स तसेच पार्किंगची देखील सुविधा करण्यात येणार आहे. तसेच या भवनात तब्ब्ल सहा हजार १४ कार्यालये असणार आहेत. तसेच यामधील साधारणत १ हजार ६८४ कार्यालये सैन्य, नागरिक आणि इतर स्टाफसाठी असणार आहे. 

 

या माध्यमातून तरुणांसाठी रोजगार संधी देखील निर्माण होणार आहेत. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत हे भवन तयार होण्याचा प्रस्ताव असून लवकरच काम सुरु होईल, असं देखील सैन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News