देशातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये एक भारतीय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 27 September 2020

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक लेख मॅग्झीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला

अमेरिकेतील प्रतिष्ठीत टाईन मॅग्झीनने देशातील सर्वांत प्रभावशाली १०० व्यक्तींच्या नावांची यादी तयार केली. त्यात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. टाईन मॅग्झीन दरवर्षी देशाती प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखणीय काम करणाऱ्या व्यक्तींची नावे टाईन मॅग्झीनमध्ये प्रसिद्ध केली जातात. २०२० सालच्या यादीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारताचे प्रभावशाली राजकीय नेता म्हणून उल्लेख करण्यात आला. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक लेख मॅग्झीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला, त्यात म्हटले की, भारत हा जगातील लोकशाहीचा सर्वांत मोठा देशा आहे. लोकशाहीत स्वतंत्र निवडणुका घेणे गरजेच्या नाहीत. निवडणुकीमध्ये सर्वांधिक मते ज्या पक्षाला मिळाली त्याचा नेता निवडला जातो. ज्यांनी विजयासाठी मतदान केले नाही त्यांचेही मोठे योगदान लोकशाहीत असते. भारतात १३० करोड जनता राहते, त्यात हिंदू, मुस्लिम, जैन, शिख, बौद्ध आशा विविध जाती धर्माचे एकत्र राहतात. तरी देखील लोकशाही टिकून आहे. 

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, एचआयव्हीचे संशोधक रविंदर गुप्ता, शाहीन बाग येथील आंदोलक बिल्किस दादी यांच्या नावाचा समावेश मॅग्झीनमध्ये आहे. त्यामुळे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News